बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानने 3 धावांनी विजय मिळवला. राजस्थानचा अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विन याने राजस्थानसाठी चमकदार अष्टपैलू प्रदर्शन केले. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला. मात्र, त्याच्यावर आता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून कारवाई देखील करण्यात आली आहे.
अश्विनची या सामन्यातील कामगिरी दमदार राहिली होती. त्याने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना 22 चेंडूवर 30 धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीला येत दोन महत्त्वपूर्ण बळी देखील टिपले. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. मात्र, आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अश्विन याने पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
या सामन्यात मैदानी पंचांनी राजस्थानच्या खेळाडूंशी चर्चा न करता चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला होता. अश्विनने या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केलेली. याच प्रकरणाने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अश्विन याने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.7 चे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्या मॅच फीस मधील 25 टक्के रक्कम कपात केली. अश्विनने आपली चूक मान्य केल्याने त्याच्यावरील पुढील कारवाई टळली.
सामन्याचा विचार केला, तर सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आल्याला राजस्था रॉयल्स संघ 20 षटकात 8 बाद 175 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सीएसकेने निर्धारित 20 षटकांमध्ये 6 बाद 172 धावा केल्या. धोनीने पुन्हा एकदा संघासाठी महत्वापूर्ण खेळी केली. त्याने 17 चेंडूत 188.23च्या स्ट्राईक रेटने नाबाद 32 धावा केल्या. तत्पूर्वी राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर या सामन्यात देखील चमकला. बटलरने 36 चेंडूत 52 धावांची ताबडतोड खेळी केली.
(Rajasthan Royals Ravichandran Ashwin has been fined 25% of his match fee for breaching the IPL Code of Conduct Against Chennai Super Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स, नाशिक द्वारका डिफेंडर्स संघ प्रमोशन फेरीसाठी पात्र
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-गुजरात सज्ज! नाणेफेक जिंकत हार्दिकचा गोलंदाजीचा निर्णय