---Advertisement---

व्हिडिओ : राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूने केली बुमराह, अश्विन आणि भज्जीच्या गोलंदाजीची नक्कल

---Advertisement---

आयपीएल मधील संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने यंदाच्या हंगामात काहीशी अडखळत सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी खेळलेल्या तीन सामन्यांपैकी त्यांनी दोन सामने गमावले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना इथून पुढे आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

मात्र याच दरम्यान आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरती राजस्थान रॉयल्सने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संघातील फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल हा जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि हरभजन सिंगच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार असून या व्हिडिओच्या शेवटच्या वेळी श्रेयस गोपालने “मी हा व्हिडीओ बुमराहला दाखवला होता आणि तो म्हणाला की मी त्याच्यापेक्षा चांगले करतो”, असे म्हटले आहे.

आज नवखा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणार्या राजस्थान रॉयल्सचा सामना अनुभवी कर्णधार विराट कोहलीच्या आत्मविश्वास उच्चावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात बंगळुरूने चमकदार कामगिरी करत आत्तापर्यंत झालेले तीनही सामने जिंकले आहेत. तर त्याचवेळी राजस्थानला एकच विजय मिळवता आला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्या आरसीबी संघाने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. परंतु राजस्थानचा संघ चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. या संघाचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करुन संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले नेले होते परंतु ते सामना जिंकू शकले नाहीत. पण दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांनी या स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या:

अखेर प्रतिक्षा संपली! धोनीने मारला यंदाच्या हंगामातील पहिला षटकार, पाहा व्हिडिओ

यजमान झिम्बाब्वेची झुंज अपयशी, पहिल्या टी२० सामन्यात पाकिस्तानचा ११ धावांनी विजयी

धोनीच्या आई-वडीलांच्या आरोग्याबाबत साक्षीने दिले महत्त्वाचे अपडेट्स; म्हणाली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---