---Advertisement---

भविष्यातील स्टार! मिडल स्टंपने फलंदाजी करणाऱ्या ९ वर्षीय चिमुकल्याच्या मदतीला आला ‘हा’ आयपीएल संघ

On: बुधवार, मे 12, 2021 3:56 PM
---Advertisement---

क्रिकेट हा भारतासह अनेक देशात लोकप्रिय खेळ आहे. या खेळाचे वेड लहान मुलांपासून जेष्ठ नागरिंकांपर्यंत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे अनेकदा अगदी लहानग्या चिमुकल्यांचे क्रिकेट खेळतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक लगानगा मुलगा मधला स्टंपने बॅटसारखा हातात घेऊन क्रिकेटमधील काही शॉट्स खेळताना दिसत आहे.

या ९ वर्षीय मुलाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की हा मुलगा ड्राईव्ह, स्वीप, स्कूप, फ्लिक असे काही शॉट्स स्टंपने शानदारपणे खेळत आहे. तो सिमेंटच्या खेळपट्टीवर सराव करत आहे. त्याच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. या लहानग्याचा व्हिडिओ व्हायरल होताच तो एका रात्रीत स्टार झाला असून राजस्थान रॉयल्स हा आयपीएलमधील संघ त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

मल्याळम मनोरमाने दिलेल्या वृत्तानुसार हा लहान मुलगा केरळचा रहिवासी असून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने संघाच्या अधिकाऱ्यांना त्याचा व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स त्या मुलाचा खर्च उचलण्यास तयार आहे. म्हणजेच राजस्थान रॉयल्स संघ या मुलाला स्पॉन्सर करेल. माध्यमातील वृत्तानुसार या मुलाची बॅट लॉकडाऊन दरम्यान तुटली होती. त्यामुळे त्याने स्टंपने फलंदाजी करण्याचा सराव करण्यास सुरुवात केली होती.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1391998612058476544

त्याच्या व्हिडिओ ‘द ग्रेड क्रिकेटर’ या ट्विटर हँडेलवरुन शेअर करण्यात आला होता.

https://twitter.com/gradecricketer/status/1390831420663160832

सोशल मीडियावर लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या गुणवंत मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच त्यांच्यातील प्रतिभा पाहून त्यांच्या मदतीसाठी अनेक लोक पुढेही येत असतात. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा देखील अशा लहान मुलांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

महत्त्वाच्या बातम्या –

रॉबिन उथप्पाच्या पत्नीने दिला जुन्या आठवणींना उजाळा, मग साक्षीनेही दिली ‘ही’ क्यूट प्रतिक्रिया

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या नेतृत्त्वपदाचा ‘हा’ खेळाडू आहे प्रबळ दावेदार, पण फिटनेसमुळे होऊ शकतो बाहेर

आधारस्तंभ हरपला! माजी भारतीय गोलंदाजाचे वडिल कालवश, त्यांच्यासाठी अर्ध्यातून सोडली होती आयपीएल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---