---Advertisement---

सराव सामन्यात जितेश शर्मा-रजत पाटीदारने गोलंदाजांना धुतले, जाणून घ्या विराट कोहलीने किती धावा केल्या

On: सोमवार, मार्च 23, 2026 1:04 PM
Rajat Patidar Virat Kohli
---Advertisement---

आयपीएल २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्व संघांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातीलच एक भाग म्हणून इंट्रा-स्क्वाड सराव सामने खेळले जात आहेत. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आपले विजेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. त्यांनी मागील हंगामाच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करत पहिला आयपीएल चषक उंचावला होता.

आयपीएलच्या १९ व्या हंगामात गतविजेत्याचा पहिला सामना सनराझर्स हैद्राबादविरुद्ध आहे. हा सामना २८ मार्चला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पूर्वतयारी म्हणून आरसीबीने नुकताच एक सराव सामना खेळला, ज्यामध्ये फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली आहे.

आरसीबीचा हा सराव सामना टीम वेंकी आणि टीम कृणाल यांच्यात खेळला गेला. वेंकी संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावत २३४ धावसंख्या उभारली. त्यामध्ये जितेश शर्मा याने ८१ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने ३७ चेंडूतच या धावा केल्या. तसेच टीम डेविडने ३६ धावा (१४ चेंडू) आणि वेंकटेश अय्यरने ३० धावा (१६ चेंडू) केल्या. यामध्ये विराट कोहलीने १२ चेंडूत तीन षटकार मारत २९ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम कृणालकडून देवदत्त पड्डीकल, कृणाल पांड्या आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतके केली. पाटीदारने २५ चेंडूत ७४ धावा केल्या. पांड्याने ३३ चेंडूत ५८ धावा आणि पड्डीकलने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या. त्यामुळे टीम कृणालने ४ विकेट्स गमावत २४७ धावा केल्या.

या सराव सामन्यांमध्ये एकच फलंदाज हा दोन्ही संघासाठी फलंदाजी करु शकतो. तसेच गोलंदाजही असे करु शकतात. सराव सामना पाहता आरसीबीचे फलंदाज चांगलेच तयार असल्याचे दिसते. मात्र संघासाठी एक चिंतेची बाब म्हणजे जोश हेझलवूड.

वेगवान गोलंदाज हेझलवूडने आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली होती. तो आता आयपीएल २०२६ च्या सुरूवातीच्या काही सामन्यांना दुखापतीमुळे मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत गतविजेता कशी सुरूवात करणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---