लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२२मधील एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. २५ मे) खेळण्यात आला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात बेंगलोर संघाचा जबरदस्त फलंदाज रजत पाटीदार याने तुफान शतक ठोकत नाद खुळा विक्रम केला. विशेष म्हणजे, तो अशी कामगिरी करणारा अनकॅप्ड (भारताच्या राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले क्रिकेटर) खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने निर्धारित २० षटकात २०७ धावा चोपल्या. या धावा करताना बेंगलोरकडून विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डावाच्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर डू प्लेसिस शून्य धावेवर तंबूत परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदार याने सेट होण्यास थोडा वेळ घेत सहाव्या षटकापासून जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.
https://twitter.com/RCBTweets/status/1529500877135958017
त्याने या वेळी खेळताना अवघ्या ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ७ षटकार आणि १२ चौकारही मारले. विशेष म्हणजे, त्याने ४९ चेंडूत वेगवान शतक झळकावले. या शतकामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा अनकॅप्ड (भारताच्या राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले क्रिकेटर) खेळाडू ठरला आहे.
https://twitter.com/IPL/status/1529495818377768960
याव्यतिरिक्त प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा चोपणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये पाटीदार हाच अव्वलस्थानी आहे. त्याने लखनऊविरुद्ध फलंदाजी करताना ११२ धावा चोपल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी मनीष पांडेचा क्रमांक लागतो. पांडेने आयपीएल २०१४मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध ९४ धावा केल्या होत्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मनविंदर बिस्ला हा फलंदाज आहे. त्याने आयपीएल २०१२मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध ८९ धावांचा पाऊस पाडला होता.
आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारे अनकॅप्ड खेळाडू
११२ धावा- रजत पाटीदार (विरुद्ध लखनऊ, २०२२)*
९४ धावा- मनीष पांडे (विरुद्ध पंजाब, २०१४)
८९ धावा- मनविंदर बिस्ला (विरुद्ध चेन्नई, २०१२)
महा स्पोर्टसच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलला अजून चार दिवस बाकी, मग काय करणार? पाहा गुजरातच्या ट्वीटवर काय म्हणाला राशिद खान
बटलरच्या वादळी खेळीने रचला जबरदस्त विक्रम; ठरला आयपीएलच्या इतिहासातील सातवाच फलंदाज
‘माझ्या खेळीवर टीका केली जायची, त्यामुळे मी…’, गुजरातच्या मॅचविनर पठ्ठ्याची मोठी प्रतिक्रिया




