रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (royal challengers Bangaluru) क्वालिफायर 1 मध्ये पंजाबचा पराभव करत अंतिम सामन्यात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या हंगामात आरसीबी (RCB) फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आत्तापर्यंत शानदार प्रदर्शन करत आली आहे. या हंगामात आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदार (Rajat Patidar) सोपवत आहे आणि तोच संघाची धुरा सांभाळत आहे. पहिल्याच हंगामात रजतने एक खास विक्रम त्याच्या नावावर केला आहे. यासोबतच तो महेंद्रसिंग धोनी (m.s dhoni), रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि हार्दिक पांड्या (Hardik pandya) यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
रजत पाटीदार पहिल्यांदा आयपीएलमध्ये आरसीबीचे नेतृत्व करत आहे आणि पहिल्याच हंगामात त्याने आरसीबीला अंतिम सामन्यात पोहोचवले आहे. विराट (Virat Kohli) सुद्धा त्याच्या पहिल्या हंगामात हे करू शकला नव्हता. रजतच्या आधी आयपीएलमध्ये हा कारनामा धोनी, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या तसेच अनिल कुंबळे (Anil kumble) यांनी केला आहे.
सामन्यात टॉस जिंकून रजत पाटीदारने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो योग्य सिद्ध झाला. यानंतर प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्स (punjab kings)101 धावांवर पूर्ण संघ ऑलआऊट झाला. पंजाबसाठी मार्कस स्टॉईनीसने सर्वात जास्त 26 धावा केल्या होत्या. याशिवाय प्रभसिमरन सिंगने 18 धावा केल्या. आरसीबी कडून हेजलवूड आणि सुयश शर्माने 3-3 विकेट्स घेतल्या, तसेच यश दयालने सुद्धा 2 विकेट्स घेतल्या होत्या.
आरसीबीने हा सामना अवघ्या 10 षटकात जिंकला या सामन्यात विराट काही खास कामगिरी करू शकला नाही परंतु फिल साल्टने 27 चेंडू 56 धावांची शानदार खेळली. याशिवाय मयंक अग्रवालने 19 तसेच रजत पाटीदारने नाबाद 15 धावा केल्या.






