राजीव शुक्ला यांना बीसीसीआय पासून कुणी फार काळ लांब ठेवू शकत नाही. आयपीएलचे माजी अध्यक्ष शुक्ला आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष होऊ शकतात असे वृत्त स्पोर्ट्सकिडाने दिले आहे. माहीम वर्मा यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएशचे काम पाहण्यासाठी बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने शुक्ला यांना ही संधी मिळू शकते.
बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे, उपाध्यक्ष पदाची रिक्त जागा एका विशेष सर्वसाधारण बैठकीद्वारे ४५ दिवसांमध्ये भरता येते. परंतु कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशातील लॉकडाऊनमुळे ते शक्य होणार नाही.
असे असले तरी व्यवस्थापनाच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, “शुक्ला यांचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.”
बीसीसआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “तरी, शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनण्यास पात्र आहेत.”
दरम्यान आयपीएलचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर शुक्ला यांनी ३ वर्षांचा कुलिंग ऑफ पिरियड पूर्ण केला आहे. सूत्रांनी सांगितले की, गांगुली आणि कंपनीने बीसीसीआयची सूत्रे हाती घेतल्यानंतर शुक्ला यांच्याकडे ३ वर्षांचा कुलिंग ऑफ पिरियड (Cooling off Period) पूर्ण करण्यासाठी आठ महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कसोटी क्रिकेटमधील आजपर्यंतची सार्वकालिन आयसीसी क्रमवारी, पहिल्या विसात केवळ एक तर तिसात दोन भारतीय
-टॉप ५: सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळलेले खेळाडू !
-२०११ विश्वचषक विजयी संघातील खेळाडू म्हणतो, केएल राहुल होणार टीम इंडियाचा कर्णधार






