---Advertisement---

काँग्रेसचा ‘हा’ नेता भूषवणार बीसीसीआयचे उपाध्यक्ष पद; २४ डिसेंबरला होणार अधिकृत घोषणा

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 12:10 PM
---Advertisement---

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार राजीव शुक्ला पुन्हा एकदा बीसीसीआयचे उपाध्यक्षपद भूषवणार आहेत. उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे माजी सचिव शुक्ला यांनी गुरुवारी (१७ डिसेंबर) मुंबईमध्ये बोर्डाच्या मुख्यालयात जाऊन आपला अर्ज भरला. या पदासाठी त्यांच्याशिवाय इतर कोणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. येत्या २४ डिसेंबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक साधारण सभेत याची अधिकृतरीत्या घोषणा केली जाईल.

उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव मोहिम वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष पदाची जागा रिकामी होती. याव्यतिरिक्त आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या सदस्य पदासाठी ब्रिजेश पटेल आणि खैरूल जमाल मजूमदार यांना निवडले आहे. यासोबतच हे निश्चित झाले आहे की, पटेल आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे अध्यक्ष पदावरही कायम असणार आहेत.

मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत सौरव गांगुली अध्यक्ष, जय शाह सचिव, जयेश जॉर्ज संयुक्त सचिव, माहिम वर्मा उपाध्यक्ष आणि अरूण धुमाळ यांना कोषाध्यक्ष म्हणून निवडले होते.

यावर्षाच्या सुरुवातीला माहिम यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आणि तेव्हापासूनच हे पद रिकामेहोते. लोढा समितीच्या शिफारसीवर आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एक सदस्य दोन पदांवर राहू शकत नाही. माहिम यांनी उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव बनण्यासाठी बीसीसीआयचे उपाध्यक्ष पद सोडले होते.

त्यांनी यापूर्वी सहा वर्षे बीसीसीआयचे उपाध्यक्षपद भूषवले होते.

बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार, शुक्ला यांना कूलिंग ऑफ पीरियड घेण्याची आवश्यकता नाही. कारण अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आयपीएल अध्यक्षाचे पद मोजले जात नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---