---Advertisement---

चेंडू स्टंप्सला लागूनही फलंदाज नाबाद, हसत उडवली भारतीय संघाची खिल्ली; पण पुढे झाला क्लिन बोल्ड

On: रविवार, जानेवारी 30, 2022 4:21 PM
---Advertisement---

भारतीय १९ वर्षाखालील संघ आणि बांगलादेश १९ वर्षाखालील संघांमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध रंगणार आहे. दरम्यान बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आगळा वेगळा प्रसंग घडल्याचे पहायला मिळाले आहे.

तर झाले असे की, बांगलादेश संघ फलंदाजीला आला असताना, पहिल्याच चेंडूवर भारतीय वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरने खतरनाक यॉर्कर चेंडू टाकला. त्यावेळी बांगलादेश संघाचा सलामीवीर फलंदाज महफीजुल इस्लाम फलंदाजी करत होता.

राजवर्धन हंगरगेकरने टाकलेला हा पहिलाच चेंडू, फलंदाज महफीजुल इस्लामने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चेंडू बॅटला लागल्यानंतर यष्टीला जाऊन धडकला. पण फलंदाज महफीजुल इस्लामला नशीबाची साथ मिळाली. त्यामुळे हा चेंडू यष्टीला जाऊन लागला तरी देखील बेल्स खाली पडली नाही. त्यामुळे तो बाद होता होता थोडक्यात बचावला.

हे पाहून भारतीय खेळाडूंनी डोक्याला हात लावला. तर फलंदाज महफीजुल इस्लाम हसू लागला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर रवी कुमारने अप्रतिम स्विंग होणारा चेंडू टाकून महफीजुल इस्लामला बाद केले होते.

https://www.instagram.com/reel/CZUNeU0lDOU/?utm_source=ig_web_copy_link

भारतीय संघाने मिळवला जोरदार विजय 
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला अवघ्या १११ धावा करण्यात यश आले होते. बांगलादेश संघाकडून मेहरोबने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. हे आव्हान भारतीय संघाने ३१ व्या षटकात पूर्ण केले.

महत्वाच्या बातम्या:

रवी कुमारच्या जादुई चेंडूने फलंदाजही बुचकळ्यात, काही कळायच्या आतच उडून पडल्या दांड्या- VIDEO

एक अविस्मणीय क्रिकेट सामना! ४५ धावांवर बाद होऊनही इंग्लंडने मिळवला होता शानदार कसोटी विजय

हे नक्की पाहा:

काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये । World Cup Semi Final 2019

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---