---Advertisement---

राम भक्त खेळाडूचा मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा ठरला पहिला खेळाडू!

On: रविवार, जून 29, 2025 6:02 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका (South Africa vs zimbabve) आणि झिम्बाब्वे संघात मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका संघाद्वारा मिळालेल्या 418 धावांचा पाठलाग करताना झिंबाब्वेचे फलंदाज चांगली टक्कर देत आहेत. कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळताना केशव महाराजने (Keshav Maharaj) अशी कामगिरी केली आहे, जिथपर्यंत कोणताही दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आज पर्यंत पोहोचू शकला नाही. केशवने सामन्यात पहिली विकेट घेत मोठी कामगिरी त्याच्या नावावर केली आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फिरकी गोलंदाज ठरलेला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने झिम्बाब्वे विरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात इतिहास रचलेला आहे. तो दक्षिण आफ्रिका संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण करणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरलेला आहे, त्याने ही कामगिरी क्रेग एर्विनला पवेलियनमध्ये पाठवून पूर्ण केली. केशव दक्षिण आफ्रिकासाठी 200 विकेट्स घेणारा 9 वा गोलंदाज ठरलेला आहे. केशवने ही कामगिरी 59 व्या सामन्यात पूर्ण केली. केशव महाराजने त्याच्या कसोटी क्रिकेटच्या एका डावामध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम 11 वेळा केलेला आहे. तसेच 6 वेळा त्याने 4 विकेट्स घेतलेल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 418 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघासाठी 19 वर्षीय लुआन प्रिटोरिअसने शानदार पारी खेळली. त्याने 160 चेंडूत 153 धावा केल्या. त्याच्या या डावादरम्यान त्याने 11 चौकार आणि 4 षटकार झळकावले. लुआन कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) दक्षिण आफ्रिकासाठी सर्वात कमी वयामध्ये शतक झळकावणारा फलंदाज ठरलेला आहे. त्याने फक्त 19 वर्ष 93 दिवसांच्या वयामध्ये शतक झळकावले. कार्बिन बॉशने देखील मधल्या फळीत शानदार फलंदाजी केली. त्याने 124 चेंडू शतक पूर्ण केले, तसेच डेवाल्ड ब्रेव्हिसने देखील वेगवान फलंदाजी करत 51 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---