भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील तिसरा टी20 सामना सेंचुरियन मैदानावर रंगला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 वर्षीय भारतीयाचे स्वप्न साकार झाले, कारण त्याला पहिल्यांदाच देशासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. मालिकेतील पहिल्याच सामन्यापासून या खास क्षणाची वाट पाहणाऱ्या अष्टपैलू रमणदीप सिंगला (Ramandeep Singh) अखेर पदार्पणाची संधी मिळाली. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याला कॅप घातली आणि त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
27 वर्षीय रमणदीप सिंगने (Ramandeep Singh) भारत-दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन टी20 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पुष्टी केली की रमणदीप सिंग (Ramandeep Singh) आजच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. वेगवान गोलंदाज आवेश खानच्या (Avesh Khan) जागी त्याला संघात स्थान मिळाले आहे.
रमणदीप सिंग (Ramandeep Singh) भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 118 वा खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) विजेतेपदासाठी रमणदीप हा महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने 14 सामन्यांत 201.61च्या खतरनाक स्ट्राइक रेटने 125 धावा केल्या होत्या.
रमणदीप गेल्या महिन्यात 2024 इमर्जिंग आशिया कपमध्ये भारत-अ संघाचा भाग होता. दरम्यान त्याने 3 डावात 191.83च्या स्ट्राइक रेटने 94 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने या स्पर्धेत 4 षटके टाकली होती. त्यामध्ये त्याने 3 विकेट्स देखील घेतल्या. रमणदीपने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 57 टी20 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 170च्या स्ट्राईक रेटने 544 धावा केल्या आहेत. सोबतच त्याने 16 विकेट्सही घेतल्या आहेत.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका- रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction 2025; मुंबईने सोडलेल्या ‘या’ 3 खेळाडूंना चेन्नई करणार टार्गेट?
“बंद करा भारतासोबत खेळणं…” माजी पाकिस्तानी दिग्गजाचे वादग्रस्त विधान
“तुमचं पाकिस्तानात स्वागत आहे”, मोहम्मद रिझवाननं दिलं भारतीय खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीचं निमंत्रण