पुढील वर्षी भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानात आशिया चषक देखील खेळला जाईल. मात्र, या दोन्ही स्पर्धा मागील महिनाभरापासून सातत्याने चर्चेत आहेत. आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, याबाबतची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानमधून अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असे देखील म्हटले होते की, भारत आशिया चषकात सहभागी झाला नाहीतर, पाकिस्तान संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही. आता याच प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे.
मागील महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले होते की, पुढील वर्षी भारतीय संघ पाकिस्तानात आशिया चषक खेळणार नाही. हीच स्पर्धा तटस्थ ठिकाणी झाल्यास भारत यात सहभागी होईल. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टोकाची भूमिका घेत म्हटलेले की, भारतीय संघाने पाकिस्तानचा प्रवास नाही केला तर पाकिस्तानही भारतात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकले.
याच प्रकरणाला धरून एका कार्यक्रमात पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले,
“पाकिस्तान संघ विश्वचषकात नाही खेळला तर तो विश्वचषक कोण पाहणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की, ते अशाच एकासाठी पाकिस्तानात आले तरच आम्ही विश्वचषक खेळायला जाऊ. अन्यथा, ते इतरांसह विश्वचषक खेळू शकतात.”
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये राजकीय तणाव आहे. याच कारणामुळे उभय देश एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. भारत व पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी केवळ आयसीसी व आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेत सहभागी होत असतात.
(Rameez Raja Spoke About Next Year ODI World Cup In India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बालपणीचे प्रशिक्षक म्हणतायेत, ‘शार्दुलला 2023 विश्वचषक खेळवाच”
‘त्यामुळे’ भारत विश्वचषक जिंकत नाहीये! रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण





