पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तिसऱ्या दिवशी (29 जुलै) भारताच्या रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला. मात्र या मेडलच्या लढतीत तिच्या पदरी निराशा आली. रमिता 8 जणांच्या इव्हेंटमध्ये 7व्या स्थानी राहिली. तिनं एकूण 145.3 गुण मिळवले.
आता अर्जुन बाबुता पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत आपलं आव्हान सादर करणार आहे. अर्जुन बाबुताचा अंतिम सामना आजच 29 जुलै रोजी होणार आहे.
रमिताची अंतिम फेरीतील कामगिरी –
पहिली सिरीज : 10.3, 10.2, 10.6, 10.9, 10.5, एकूण: 52.5 गुण
दुसरी सिरीज : 10.4, 10.1, 10.7, 10.6, 9.7, एकूण: 51.5 गुण
उर्वरित चार शॉट्स : 10.4, 10.5, 10.2, 10.2, एकूण: 41.3 गुण
पात्रता फेरीत 20 वर्षीय रमिता पाचव्या स्थानावर राहिली होती. रमितानं पात्रता फेरीत 60 शॉट्समध्ये 631.5 गुण मिळवले होते. रमितानं पहिल्या सिरीजमध्ये 104.3, दुसऱ्यामध्ये 106.0, तिसऱ्यामध्ये 104.9, चौथ्यामध्ये 105.3, पाचव्यामध्ये 105.3 आणि सहाव्या सिरीजमध्ये 105.7 गुण मिळवले होते. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारताची एलावेलिन वॅलारिव्हनही सहभागी झाली होती, परंतु ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. वालारिवन 630.7 गुणांसह 10व्या स्थानावर राहिली.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रमिता ही अकाउंट्सची विद्यार्थिनी आहे. रमिताचे वडील अरविंद जिंदाल हे टॅक्स सल्लागार आहेत. 2016 मध्ये रमिताला तिचे वडील शूटिंग रेंजमध्ये घेऊन गेले होते. यानंतर रमिताचा या खेळाकडे कल वाढला. 20 वर्षीय रमितानं 2022 मध्ये ज्युनियर ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर तिनं हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोन पदकं जिंकली.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीला धक्का! दुसऱ्या फेरीचा सामना अचानक रद्द
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासोबत अन्याय, बॅडमिंटनपटूचा विजय ठरला अवैध! कारण जाणून बसेल धक्का
मनू भाकरचं स्वप्नवत यश; खुलासा करताना म्हणाली, “काल भगवद्गीतेतील तो प्रसंग वाचला अन् आज….”