आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसीने) २०२४ पासून ते २०३१ पर्यंतचे आयसीसी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केला आहे. ज्यामध्ये २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा देखील समावेश आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार का? याबाबत रमीझ राजा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि आशिया चषक २०२३ स्पर्धेचे आयोजन देखील पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांना दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका तसेच २०२३ आशिया चषक स्पर्धेत भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आले.
याबाबत बोलताना रमीझ राजा म्हणाले की,” द्विपक्षीय मालिका खूप कठीण वाटत असली, तरी तिरंगी मालिका खेळवणे अजूनही शक्य आहे. दुसरीकडे, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा विचार केला जातो, तेव्हा तुम्ही माघार घेऊ शकत नाही. कारण तुमच्यावर खूप दबाव असतो. जेव्हा एखाद्या देशाकडे स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी सोपवली जाते, तेव्हा अगदी सुरुवातीलाच सर्व शक्यतांवर चर्चा केली जाते. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडेल, असे आम्हाला वाटत नाही.”
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ सुरू असताना भेट घेतली होती. तसेच दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा स्तर कसा वाढेल याबाबत चर्चा देखील केली होती.
याबाबत बोलताना रमीझ राजा यांनी म्हटले की, “सौरव गांगुलीसोबत माझे चांगले संबंध आहेत आणि जागतिक क्रिकेट कसे पुढे जाऊ शकते यावर आम्ही खूप चर्चा केली. आमच्याकडे आता निर्णय घेण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत, परंतु ते सोपे नाही. जोपर्यंत राजकीय मर्यादा आहेत, तोपर्यंत सर्व कठीण आहे.”
भारतीय संघाने यापूर्वी आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा २०२१ मध्ये यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. पण, कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आशिया चषक २०२२ स्पर्धचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले आहे. तर २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!!
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान दवाचा प्रभाव जाणवणार? पाहा कोणासाठी असेल अनुकूल खेळपट्टी
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!