काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२२चा हंगाम पूर्ण झाला आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे असे ही मानले जाते. जसे जगभराचे खेळाडू खेळण्यासाठी येतात तसे प्रेक्षकही या सर्व खेळाडूंना खेळताना आणि आपल्या आवडत्या संघांला जिंकताना पाहण्यासाठी मैदानात येत असतात. मग तो सामना भारतात असो, दक्षिण आफ्रिका असो वा युएई असो. आयपीएलची ओढ मात्र सर्वांनाच असते. मात्र या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मुकतात ते पाकिस्तानी क्रिकेटर्स. याच पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेयरमन रमीझ राजा यांनी सांगितले की, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने त्यांना आयपीएलच्या अंतिम सामन्यांसाठी आमंत्रित केले होते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेयरमन रमीझ राजा बोर्ड मीटिंगनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की,’ बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने त्यांना गेल्या दोन आयपीएलच्या अंतिम सामन्यांसाठी आमंत्रण पाठवले होते. गांगुलीने फक्त यावर्षी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठीच आमंत्रण पाठवले होते असे नाही त्याने मागील वर्षी युएई येथे झालेल्या अंतिम सामन्यासाठी सामन्याचे देखील आमंत्रण पाठवले होते. मात्र त्यांनी आपल्या जनतेशी भावनात्मक संबंध आणि सध्याचे राजनितिक संबंध पाहता त्यांनी आपला निर्णय घेतला आणि नाही जाण्याचे ठरवले. एक क्रिकेटप्रेमी केिंवा क्रिकेटरसिक म्हणुन माझे जाणे बनते मात्र अजुनही गोष्टींना बदलण्यास वेळ लागेल.’
➡️ 2022-23 financial budget
➡️ Enhanced central contracts with increase in number of contracted men and women's players
➡️ Creation of Pakistan Cricket Foundation as a charitable trust📹: https://t.co/gP1kRgUyGV
🗒️: https://t.co/ez2Ptn4vnv pic.twitter.com/UAJYksKxa1— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 24, 2022
पुढे ते म्हणाले की, ‘मी जेव्हापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेयरमन म्हणुन काम सांभाले आहे पाकिस्तानच्या खेळाच्या स्तरात वाढ झाली आहे. मी सप्टेंबर मध्ये चेयरमनपदाचे काम सांभाळायला सुरुवात केली आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे कसोटी क्रिकेटचे प्रदर्शन उंचावले आहे. आतापर्यत सर्वप्रकारातील खेळल्या गेलेल्या २४ सामन्यात ७५% सामने आपण जिंकले आहेत. दरम्यान भारताने ६८% तर ४५% सामने जिंकले आहेत. याचाच अर्थ पाकिस्तान चांगल्या दिशेने जात आहे.’
आयपीएलच्या दुसऱ्याच हंगामापासून पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्यास बीसीसीआयने बंदी आणली. पाकिस्तानी खेळाडू आतापर्यंत फक्त २००८ सालच्या म्हणजेच आयपीएलच्या पहिल्याच हंगामामध्ये खेळले आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोन्ही संघात आयसीसीच्या चषकातील सामन्यंना सोडुन कोणतेही सामने खेळले जात नाहीत. भारत आणि पाकिस्तान संघात गेल्या दशकापासून कोणत्याही प्रकारची मालिका खेळवल्या गेलेली नाही. दोन्ही देशांच्या सीमेवरील तणावांना बघता ते शक्य झालेले नाही. दोन्ही देशांतुन अधुनमधुन ऐकायला मिळते की दोन्ही देशांमध्ये द्वीपक्षीय मालिका खेळल्या जाऊ शकते मात्र अद्दाप असे काहीच घडलेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हे’ आहेत निवृत्तीनंतर अठराविश्व दारिद्रय पाहणारे पाच खेळाडू, यादी पाहून तुम्हीही हैरान व्हाल
बाद केल्यानंतर फलंदाजाच्या गळ्यात पडून केले सेलेब्रेशन, शमी पुजाराची मैत्री एकदा बघाच