क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहेत. दरदिवशी ते आशिया चषक 2023 आणि वनडे विश्वचषक 2023बद्दल भारताविरुद्ध वक्तव्य करत असतात. अशात ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माध्यमांमध्ये असे म्हटले जात आहे की, रमीज यांना कोणत्याही क्षणी अध्यक्षपदावरून अधिकृतरीत्या हटवले जाऊ शकते. तसेच, त्यांच्या जागी माजी अध्यक्ष नजम सेठी यांना अध्यक्ष म्हणून नेमले जाऊ शकते.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, शनिवारी (दि. 17 डिसेंबर) लाहोरमध्ये पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची भेट घेतली. खरं तर, पाकिस्तानचे पंतप्रधानच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे संरक्षक असतात आणि तेच अध्यक्षाची निवडही करतात. दुसरीकडे, भारत सरकार बीसीसीआयच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करत नाही.
दुसरीकडे, नजम सेठी यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर ते एक प्रसिद्ध पत्रकार होते, ज्यांनी दोन वेळा (2013 ते 2014 आणि 2017 ते 2018) पीसीबीचे अध्यक्षपद भूषवले आहे. पाकिस्तान सुपर लीगची सुरुवातही नजम सेठी यांनीच केली होती.
चाहतेही रमीज राजांबद्दल मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.
मागील वर्षी रमीज राजा बनले होते अध्यक्ष
विशेष म्हणजे, रमीज राजा सन 2021मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनले होते. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान होते. त्यांनीच रमीज राजा यांनी अध्यक्षपदावर बसवले होते. पीसीबी अध्यक्ष बनल्यानंतर रमीज राजांनी भारत आणि बीसीसीआयविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते.
दुसरीकडे, इम्रान खान (Imran Khan) पंतप्रधान पदावरून हटल्यानंतर असा अंदाज बांधला जात होता की, रमीज राजांनाही पद सोडावे लागू शकते. मात्र, एप्रिल महिन्यानंतरपासून ते आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते त्यांच्या पदावर कायम होते. खरं तर, पाकिस्तान अध्यक्षाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. मात्र, त्यापूर्वीच रमीज राजा यांना हटवले जाऊ शकते. (ramiz raza is likely to be sacked anytime from pcb chairman post sources read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या दिवशीच संपला असता पहिला कसोटी सामना, पण पंतकडून झाली मोठी चूक; फलंदाज बाद असूनही…
आयसीसीसोबतचा ‘हा’ वाद भारताला महागात पडणार! विश्वचषकाच्या यजमानपदासाठी मोजावे लागणार 900 कोटी






