भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथन याने शनिवारी (७ नोव्हेंबर) एकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपांत्य सामन्यात जर्मनीच्या मार्व्हिन मोल्लरचा ४-६, ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. यासह त्याने हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली.
यापूर्वी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रामनाथन याने एकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात रशियाच्या एव्हगेनी दोनस्कोयचा ६-२, ६-१ असा सहज पराभव केला होता.
आता रविवारी (८ नोव्हेंबर) अंतिम सामन्यात रामनाथन सेबॅस्टियन कोर्डाचा सामना करेल. चॅलेन्जर सर्किटवरील हा त्याचा पाचवा पुरुष एकेरी अंतिम सामना आहे. त्याने एकदाही हे पदक जिंकलेले नाही. रविवारी होणाऱ्या सामन्यात तो हे पदक जिंकले का हे पाहावे लागेल.
वाचा-
-मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुलगा अमितमध्ये रंगला टेनिसचा सामना
-भारतीय टेनिसपटू दिविज आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर