---Advertisement---

महाराष्ट्र संघाची लाजीरवाणी कामगिरी, तब्बल ८ खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2020 1:38 PM
---Advertisement---

भारतात रणजी ट्रॉफीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेची चौथी फेरी आजपासून(3 जानेवारी) सुरु झाली आहे या फेरीत महाराष्ट्र विरुद्ध सर्विसेस संघात दिल्ली येथे सामना होत आहे. मात्र या सामन्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र संघाचा पहिला डाव केवळ 44 धावांत संपुष्टात आला आहे.

या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्याच षटकात मुर्तझा ट्रंकवाला शून्यावर बाद झाला. त्याच्या पाठोपाठच्या षटकात नवशाद शेख(0) आणि ऋतुराज गायकवाड(4) बाद झाले.

त्यानंतर अंकित बावणे आणि राहुल त्रिपाठीने थोडा प्रतिकार केला, पण बावणे 41 चेंडूत 6 धावा करुन आणि त्रिपाठी 39 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला.

महाराष्ट्र संघाकडून केवळ सत्यजीत बछाव आणि चिराग खूराना यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. बछावने 11 धावा आणि चिरागने 14 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त महाराष्ट्र संघाचे 8 खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले. तसेच मुकेश चौधरी शून्यावर नाबाद राहिला.

सर्विस संघाकडून पुनम पुनियाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. या 5 विकेट्स त्याने 10.2 षटके गोलंदाजी करताना 11 धावा देत घेतल्या. तसेच सच्चिदानंद पांडेने 3 विकेट्स आणि दिवेश पठाणियाने 2 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---