---Advertisement---

बीसीसीआयने जाहीर केले रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार सामने

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 1:29 PM
BCCI Logo
---Advertisement---

भारतीय क्रिकेटचा कणा समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचा नवीन हंगाम जाहीर झाला आहे. जानेवारी 2022 पासून ही स्पर्धा सहा शहरांमध्ये आयोजित केली जाईल. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा 16 नोव्हेंबर 2021 ते 19 फेब्रुवारी 2022 दरम्यान खेळली जाणार होती. मात्र आता 13 जानेवारी 2022 ते 20 मार्च 2022 या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल. प्रत्येक संघाला प्रत्येक सामन्याआधी पाच दिवसांच्या विलगिकरणात राहणे अनिवार्य असेल.

कोलकातामध्ये 20 फेब्रुवारीपासून बाद फेरीतील सामने होतील. तसेच 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान उपांत्यपूर्व सामने होतील. त्यानंतर 8 मार्च ते 12 मार्च या अवधीत उपांत्य सामने व रोमांचक अंतिम सामना 16 ते 20 मार्चमध्ये होईल.

कोरोनानंतर प्रथमच रणजी करंडक स्पर्धेसाठी संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले आहे. या अंतर्गत सहा गट तयार करण्यात आले आहेत. पाच गटांमध्ये एलिट संघ असतील, तर एक गट प्लेट संघासाठी म्हणजेच नवीन आणि कमकुवत संघ यांच्यासाठी बनवण्यात आला आहे. एलिट गटात सहा संघ असतील तर प्लेट गटात आठ संघ असतील.

स्टार खेळाडूंनी भरलेली मुंबई, कर्नाटक आणि दिल्ली संघ एलिट क गटात आहेत. तर एकेकाळचे विजेते संघ हैदराबाद, महाराष्ट्र आणि उत्तराखंड देखील गट कमध्ये आहेत. त्यांचे सामने कोलकाता येथे खेळवले जातील. गेल्या वर्षीचा उपविजेता बंगाल संघ विदर्भ, हरियाणा, केरळ, त्रिपुरा आणि राजस्थान यांच्यासह ब गटात आहे. गतविजेता सौराष्ट्र, तामिळनाडू, रेल्वे, जम्मू-काश्मीर आणि गोवा गट डमध्ये आहेत.

गट अ पण दमदार स्पर्धकांनी भरलेला आहे. ज्यात गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, सर्विसेस आणि आसामसारखे संघ आहेत. गट ईमध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बडोदा, ओडिशा, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. चंदीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यासारखे संघ प्लेट गटाचे सौंदर्य वाढवतील. गट अचे सामने मुंबई, गट ब बेंगळुरू आणि गट क कोलकातामध्ये, गट डचे अहमदाबाद, गट ईचे त्रिवेंद्रम आणि प्लेट गटाचे चेन्नई येथे होतील.

महामारीपुर्वी झालेल्या स्पर्धेत, सौराष्ट्र संघाने रणजी करंडक जेतेपदावर आपले नाव कोरले होते. बंगाल संघ उपविजेता ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

केकेआरच्या खेळाडूंची ‘क्वारंटाईन अंतक्षरी’ पाहिली का? व्हिडिओ पाहून होईल पैसावसूल मनोरंजन

भारतीय फलंदाजांचा समाचार घेणारा इंग्लंडचा ‘हा’ अनुभवी गोलंदाज कसोटी मालिकेनंतर घेणार निवृत्ती

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा फलंदाजीवरुन विराटला टोला; म्हणे, ‘आशियाई फलंदाज असून इंग्लंडमध्ये फ्लॉप’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---