---Advertisement---

काय सांगता! रँडी ऑर्टन मोडणार जॉन सीनाचा ‘तो’ जबरदस्त विक्रम, ऑलिम्पिक विजेत्या कर्ट अँगलचा विश्वास

On: गुरूवार, जून 2, 2022 4:01 PM
John-Cena-And-Randy-Orton
---Advertisement---

सोळा वेळचा वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट (डबल्यूडबल्यूई) चॅम्पियन जॉन सीना गेल्या काही काळापासून अर्धा वेळ रेसलर म्हणून खेळत आहे. मात्र, त्यानंतरही त्याची डबल्यूडबल्यूई यामधील लोकप्रियता कमी झालेली नाही. त्याच वेळी, आता प्रसिद्ध रेसलर कर्ट अँगलने त्याच्या पॉडकास्टच्या ताज्या भागात त्याच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. जॉन हा डबल्यूडबल्यूईचा सर्वात मोठा स्टार आहे, असे मत त्याने मांडले आहे.

जॉन सीना (John Cena) याबद्दल बोलताना कर्ट अँगल (Curt Angle) म्हणाला की, “जर तुम्ही जॉन जॉनच्या संपूर्ण कारकिर्दीवर नजर टाकली, तर तुम्हाला कळेल की, तो डबल्यूडबल्यूईचा सर्वात मोठा स्टार आहे. त्याने सर्व विश्वविजेतेपदे जिंकली आहेत. असे करणारा तो एकमेव स्टार आहे. डबल्यूडबल्यूईमध्ये राहून त्याने हा पराक्रम केला आहे. त्यामुळे तो इतर स्टार्सपेक्षा वेगळा आहे.”

रिक फ्लेअरने त्याच्या कारकिर्दीत 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. याशिवाय जॉन सीनाने आपल्या कारकिर्दीत १६ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. अशा स्थितीत आपल्या विक्रमाबद्दल बोलताना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कर्ट अँगल म्हणाला की, “तो नक्कीच रिक फ्लेअरचा विक्रम मोडेल असा मला विश्वास आहे. मला वाटतं जॉन सीना १७व्यांदा नक्कीच वर्ल्ड चॅम्पियन बनेल. याशिवाय रँडी ऑर्टन भविष्यात जॉन सीनाचा विक्रमही मोडू शकेल, असे मला वाटते. आपल्या सर्वांना माहित आहे की, रेकॉर्ड बनवल्याबरोबर ते तोडले जातात. त्यामुळे रँडी जॉनचा रेकॉर्ड मोडू शकेल असे मला वाटते.”

दरम्यान, जॉन सीना आणि रॅंडी ऑर्टन हे एक दशकाहून अधिक काळ डबल्यूडबल्यूईचे सर्वात मोठे स्टार आहेत, त्यामुळे आता कोण कोणाचा रेकॉर्ड कोण मोडतो हे पाहणे मनोरंजक असेल.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पुणे ओपन २००० खालील फिडे रेटिंग बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत निखिल एम, राहुल वर्मा, ऋषी कदम यांची विजयी सलामी

ग्रँडमास्टर फारुख आमोनतेव्ह, ग्रँडमास्टर अलेक्झी फेडरोव्ह, ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ता यांची विजयी सलामी

बुद्धिबळामुळे सतत जागरूक राहण्याची सवय : देवेंद्र फडणवीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---