भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.या दोन्ही संघांमध्ये १३ जुलै पासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु, श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. आता या मालिकेला येत्या १८ जुलै पासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी असणाऱ्या पंचांची नावेही समोर आली आहेत.
विश्व क्रिकेटमधील अनुभवी सामना अधिकारी रंजन मदुगले हे या मालिकेत सामना अधिकाऱ्याची भूमिका पार पडणार आहेत. श्रीलंकेचे माजी कर्णधार मदुगले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (आयसीसी) मुख्य सामना अधिकारी आहेत. या मालिकेत मैदानावरील पंचांचे नेतृत्व आयसीसी एलिट पॅनेलचे पंच कुमार धर्मसेना करणार आहेत.(Ranjan madugalle will be the match refree for india vs srilanka series dharmasena among five umpires)
कोविड -१९ नंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. परंतु, द्विपक्षीय मालिकेत आयसीसीने बोर्डांना त्यांचा स्वतःचा घरगुती पंच आणि सामना अधिकारी निवडण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्यांच्या प्रवासात आणि इतर खर्चात कपात होऊ शकेल. या सामन्यात कुमार धर्मसेनासह लिंडन हेनिबल, प्रगीथ रामबुकवेला, रवदींद्र विमलासिरी आणि रुचिरा पल्लियागुरुगे हे देखील पंच असणार आहेत.
असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै, कोलंबो
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै, कोलंबो
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै, कोलंबो
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै, कोलंबो
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै, कोलंबो
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै, कोलंबो
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
अगग! चेंडू गरकन् फिरला अन् फलंदाजाला कळायच्या आत बत्त्या गुल; अनेकांना झाली वॉर्नची आठवण
ऐतिहासिक कामगिरी! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयर्लंडने रचला इतिहास, वनडे मालिकेतही घेतली आघाडी