रणजी ट्रॉफी 2024-25 ला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. दरवेळेप्रमाणे, या हंगामातही सर्वांच्या नजरा अशा खेळाडूंवर असतील, ज्यांना टीम इंडियाचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना लवकरच टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते. याशिवाय या खेळाडूंवर आयपीएल 2025 मध्येही चांगली बोली लागू शकते.
(1) अभिमन्यू ईश्वरन – बंगालचा स्टार फलंदाज अभिमन्यू ईश्वरन अनेक दिवसांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. त्यानं आतापर्यंत 98 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 7506 धावा केल्या आहेत. या हंगामातही त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या, तर त्याचा टीम इंडियात समावेश होऊ शकतो.
(2) तनुष कोटियन – मुंबईकडून खेळणारा हा फिरकी अष्टपैलू खेळाडू सध्या चांगलाच चर्चेत आहे. इराणी कपमध्ये तनुषनं पहिल्या डावात 64 आणि दुसऱ्या डावात नाबाद 114 धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय या सामन्यात त्यानं 3 विकेट्सही घेतल्या. या कामगिरीच्या आधारे तनुषला लवकरच टीम इंडियात संधी मिळू शकते.
(3) सारांश जैन – मध्य प्रदेशकडून खेळणारा सारांश जैन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. इराणी चषक स्पर्धेत ‘रेस्ट ऑफ इंडिया’कडून खेळताना सारांशनं एकूण 7 विकेट घेतल्या. त्यानं आतापर्यंत 35 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
(4) मानव सुथार – राजस्थानकडून खेळणारा मानव सुथार नुकत्याच झालेल्या इराणी चषकात रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळला होता. तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे.
(5) शम्स मुलानी – रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणारा फिरकी अष्टपैलू शम्स मुलानीवर सर्वांच्या नजरा असतील. तो इराणी कप 2024 शम्स मुंबईकडून खेळताना दिसला होता.
हेही वाचा –
माजी कर्णधारासह दिग्गज गोलंदाजाला रिलिज करण्याच्या मूडमध्ये सनरायझर्स हैदराबाद! या खेळाडूंना करणार रिटेन
गौतम गंभीरचा नादच खुळा! टी20 मालिकेत घेतलेले हे 3 मोठे निर्णय ठरले मास्टरस्ट्रोक!
मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं ट्रॉफी कोणाला दिली? टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल