---Advertisement---

गौतम गंभीरचा नादच खुळा! टी20 मालिकेत घेतलेले हे 3 मोठे निर्णय ठरले मास्टरस्ट्रोक!

gautam gambhir
---Advertisement---

भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत शानदार विजय नोंदवला. टीम इंडियानं बांगलादेशचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. विशेष म्हणजे, या तिनही सामन्यात भारतीय संघानं एकतर्फी विजय नोंदवला. तिसऱ्या सामन्यात तर बांगलादेशचा संघ भारताचा बिलकूल मुकाबला करू शकला नाही. या सामन्यात भारतीय संघानं 133 धावांनी विजय मिळवला. टी20 मधील भारताचा हा सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे.

भारताच्या या ऐतिहासिक यशात खेळाडूंसह कोच गौतम गंभीर याची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यानं काही असे निर्णय घेतले, ज्यामुळे बांगलादेशचा संघ काहीच करू शकला नाही. गौतम गंभीरनं कोणकोणते मोठे निर्णय घेतले, हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.

(1) अष्टपैलू खेळाडूंना महत्त्व दिलं – गौतम गंभीर जेव्हा भारताचा मुख्य प्रशिक्षक बनला, तेव्हा त्यानं स्पष्ट केलं होतं की प्रत्येक खेळाडूला गोलंदाजी करता आली पाहिजे. त्यामुळेच आता गोलंदाजीत भारतीय संघाकडे भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत. दुसऱ्या टी20 मध्ये हार्दिक पांड्याला गोलंदाजी करण्याची वेळच आली नाही. तर तिसऱ्या टी20 मध्ये भारतानं 7 गोलंदाजांचा वापर केला. यावरून दिसून येतं की, भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंची काही कमी नाही.

(2) संजू सॅमसनला सलामीला पाठवलं – टी20 मालिकेसाठी जेव्हा यशस्वी जयस्वालची निवड झाली नाही, तेव्हा सलामीला कोण उतरेल असे प्रश्न विचारले जात होते. गौतम गंभीरनं या मालिकेत संजू सॅमसनला सलामीला पाठवलं. त्याचा हा निर्णय काही प्रमाणात योग्य ठरला. तो दुसऱ्या सामन्यात काही कमाल करू शकला नाही, मात्र तिसऱ्या सामन्यात त्यानं झंझावाती शतक ठोकलं.

(3) आक्रमक शैली – गौतम गंभीरनं आधीच स्पष्ट केलं आहे की, त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया आक्रमक क्रिकेट खेळेल. म्हणजेच, जो फलंदाज क्रिजवर आला, तो जोरदार फलंदाजी करेल. याच वृत्तीमुळे तिसऱ्या टी20 मध्ये भारतानं जवळपास 300 धावा केल्या. या सामन्यात प्रत्येक फलंदाजानं आक्रमक रुप धारण केलं होतं. याचा संघाला खूप फायदा झाला.

हेही वाचा – 

मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं ट्रॉफी कोणाला दिली? टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये केला नवा विश्वविक्रम, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यादीतही नाही
टीम इंडियाची हैदराबादमध्ये रेकाॅर्डतोड कामगिरी; बांग्लादेशच्या बत्या गुल..!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---