दिल्ली। फिरोजशाह कोटला स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत गट ब मध्ये पंजाबचा सामना बुधवारपासून (28 नोव्हेंबर) दिल्ली विरुद्ध सुरु आहे. यावेळी भारतीय स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग फलंदाजीला आल्यावर प्रेक्षकांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.
408 दिवसाच्या अनुपस्थितीनंतर खेळणाऱ्या युवराजवर आज सगळ्यांचे लक्ष होते. त्याने पाचव्या क्रमांकावर येताना संयमाने फलंदाजी करत 29व्या चेंडूवर पहिला चौकार मारला.
याआधी दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला येताना सर्वबाद 107 धावाच केल्या. तसेच दिल्लीकडून गौतम गंभीरही या सामन्यात खेळला. मात्र त्याला फक्त एकच धाव करता आली.
फलंदाजीला आल्यावर पंजाबची स्थितीही जरा नाजूकच झाली होती. त्यांनी 32 धावांवर दोन गडी गमावले होते. युवराजला या सामन्यात शुभमन गीलच्या जागी घेण्यात आले आहे. गीलची न्युझीलंड विरुद्धच्या दौऱ्यासाठी इंडिया ए संघासाठी निवड करण्यात आली आहे.
28 चेंडू खेळल्यावर पहिली धाव झाल्यानंतर युवराजने सुटकेचा श्वास सोडला. प्रथम धाव घेण्याचे त्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र पहिला चौकार मारल्यावर संपूर्ण स्टेडियम आनंदमय झाले होते.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर पंजाब 29 धावांनी आघाडीवर होती. त्यांचे 3 बाद 136 धावा झाल्या होत्या. तसेच मनदिप सिंग नाबाद 54 धावा आणि युवराजही 47 चेंडूत 16 धावांवर खेळत आहे. तर गोलंदाजीतही पंजाबच्या सिद्धार्थ कौलने 32 धावांमध्ये 6 विकेट्स घेत दिल्लीला रोखण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.
युवराजने भारताकडून शेवटचा सामना जून 2017 मध्ये खेळला आहे. मात्र त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. तसेेच त्याला आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबनेही 2019 च्या आयपीएलसाठी मुक्त केले आहे.
त्याने भारताकडून 40 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 1900 धावा आणि 9 विकेट्स केल्या आहेत. तर 304 वनडे सामन्यात 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या आहेत.
युवराज यापुर्वी शेवटचा रणजी सामना १४ आॅक्टोबर २०१७ रोजी विदर्भाविरुद्ध खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही स्थान न मिळालेल्या युवराजला या संघाने दिला सहारा
–पृथ्वी शाॅचा धमाका सुरुच, आॅस्ट्रेलिया दौऱ्याची धमाकेदार सुरुवात
–पोस्टर बॉय राहुल चौधरीचा प्रो कबड्डीमध्ये भीमपराक्रम
–ISL 2018: चेन्नईयीन-ब्लास्टर्स यांच्यात आज महत्त्वाचा सामना