---Advertisement---

एकही धाव न देता बिहारच्या या गोलंदाजाने घेतल्या तब्बल ७ विकेट्स

---Advertisement---

पटना। रणजी ट्रॉफी 2019-20 स्पर्धेतील चौथ्या फेरीत बिहारने मिझोरमविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बिहारच्या या विजयात अभिजित साकेतने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात दुसऱ्या डावात 10 षटके गोलंदाजी करताना 12 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. पण त्याने या 7 ही विकेट्स त्याने टाकलेल्या पहिल्या 6 षटकात घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने या 7 विकेट्स घेताना पहिल्या 6 षटकात एकही धाव दिली नव्हती. त्याने 6 षटके निर्धाव टाकल्यानंतरच्या 4 षटकात 12 धावा दिल्या.

त्याच्या या कामगिरीमुळे मिझोरमचा दुसरा डाव केवळ 68 धावांवरच संपुष्टात आला. या डावात केवळ मिझोरमचा कर्णधार केबी पवनलाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्याने 46 धावांची एकाकी झुंज दिली.

मात्र अन्य फलंदाजांना काही खास करता आले नाही. त्यांचे 6 फलंदाज शून्यावरच बाद झाले. यातील 5 फलंदाजांना साकेतने बाद केले.

मिझोरम 68 धावांवर सर्वबाद झाल्याने बिहारला पहिल्या डावातील 116 धावांच्या पिछाडीमुळे विजयासाठी 185 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान बिहारने दुसऱ्या डावात 32.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत सामना जिंकला.

बिहारकडून इंद्रजित कुमारने 98 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर बबूल कुमारने 61 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी पहिल्या डावात मिझोरमने सर्वबाद 378 धावा केल्या होत्या. त्याच्याकडून प्रतिक देसाईने 192 धावांची दिडशतकी खेळी केली होती. तर तरुवर कोहलीने 95 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या डावात बिहारकडून कर्णधार अशितोष आमनने 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर मिझोरमने बिहारचा पहिला डाव 262 धावांवर संपुष्टात आणत 116 धावांची मोठी आघाडी घेतली होती. बिहारकडून पहिल्या डावात बबुल कुमार(85) आणि एमडी राहमत्तुलाहने(58) अर्धशतकी खेळी केल्या होत्या. या डावात मिझोरमकडून कोहलीने 5 विकेट्सही घेतल्या होत्या.

https://twitter.com/Maha_Sports/status/1213787120839491584

https://twitter.com/Maha_Sports/status/1213783414995730443

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---