---Advertisement---

Ranji Trophy 2022: ६१ धावांवर संपुष्टात आला ‘या’ संघाचा डाव, ५ खेळाडू भोपळाही न फोडता परतले तंबूत

On: शुक्रवार, फेब्रुवारी 25, 2022 5:34 PM
Gaurav-Yadav
---Advertisement---

रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत प्रत्येक वर्षी नवे- जुने चेहरे पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे गौरव यादव (Gaurav Yadav). रणजी करंडक एलिट गटातील मेघालय विरुद्ध  मध्य प्रदेश संघातील सामन्यादरम्यान गुरुवारी (२४ फेब्रुवारी) मेघालय संघाचा पहिला डाव ६१ धावांवर संपुष्टात आला. संघातील पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. मध्यप्रदेशचा वेगवान गोलंदाज गौरव यादव याच्या शानदार गोलांदाजीमुळे हे सर्व शक्य झाले. अवघ्या ११ धावांमध्ये गौरवने पाच बळी घेतले आणि आपल्या पहिल्या चेंडूवरच पहिला बळी घेतला.

मध्य प्रदेशाच्या फलंदाजांनी २ गडी गमावून १४१ धावा केल्या. मेघालयचे दोनच फलंदाज मोठी धावसंख्या गाठू शकले. मेघालय संघाने २५ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. मेघालयची सर्वोच्च धावसंख्या १९ धावा होती. वानलेम्बॉकने १९ धावा केल्या. मध्य प्रदेशचे वेगवान गोलंदाज ईश्वरचंद्र पांडे, अनुभव अग्रवाल यांना १-१ बळी मिळाला. वेगवान गोलंदाज कुमार कार्तिकेयने दोन बळी घेतले. यादवने बाद केलेल्या खेळाडूंमध्ये सलामीवीर वल्लम किंशी (२), चिराग खुराना (०), कर्णधार पुनित बिश्त (०), लॅरी संगमा (०) आणि रवी तेजा (८) यांचा समावेश होता.

बिहार संघाकडून पदार्पणाच्या सामन्यात त्रिशतक झळकावलेल्या साकिबुल गनीने नाबाद ९८ धावा, बाबुल कुमारने ७३ आणि बिपीन सौरभने नाबाद ५० धावा केल्या. यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात बिहारने चार विकेट्स गमावून ३१५ धावा केल्या. मागील सामन्यात पदार्पण करणाऱ्या गनीने या सामन्यात देखील त्याची खेळी कायम ठेवली आणि तो या सामन्यात त्याच्या शतकापासून फक्त दोन धावा दूर होता. त्याने १३३ चेंडूत ९८ धावा करत १८ चौकार मारले आहेत.

दिल्लीविरुद्ध झारखंड सामन्यात विराट सिंगने मधल्या फळीत जबाबदार खेळी खेळताना १७१ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०३ धावा केल्या. त्यामुळे झारखंडने २५१ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीची सुरुवातही चांगली झाली नाही आणि युवा फलंदाज यश धूल याची विकेट गमावली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दिल्लीने एक विकेट गमावत २८ धावा केल्या होत्या.

फिरकी गोलंदाज तनय त्यागराजनच्या पाच विकेट्समुळे हैदराबादने बंगालला पहिल्या डावात २४२ धावांत गुंडाळले. त्यागराजनने ३७ धावांत पाच बळी घेतले. रवी तेजाने तीन आणि बी पुनैयाने दोन गडी बाद केले. बंगालकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आठव्या क्रमांकाचा फलंदाज अभिषेक बॅनर्जीने सर्वाधिक ७३ धावा केल्या, तर शाहबाज अहमदने ४० धावांचे योगदान दिले.

चंदीगड बडोद्याविरुद्ध अवघ्या १६८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात विरोधी संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ गडी गमावून ८० धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

संधीचे सोने! तब्बल ९७ सामन्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळेलेल्या फलंदाजाचा न्यूझीलंडविरुद्ध शतकी तडाखा

द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय

‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---