---Advertisement---

आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाचे रणजी ट्रॉफीत विक्रमी अर्धशतक, ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी

On: गुरूवार, जून 9, 2022 6:06 PM
RCB-Team
---Advertisement---

आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला यावर्षी देखील विजेतेपद पटकावता आले नाही. आरसीबीचाच वेगवान गोलंदाज आकाश दीपचे या हंगामातील प्रदर्शन सर्वसाधारन राहिले. आयपीएलनंतर रणजी ट्रॉफी २०२२चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सध्या सुरू असेलल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये बंगाल संघासाठी खेळणाऱ्या आकाश दीपने जबरदस्त फलंदाजी करून दाखवली आहे.

आरसीबीसाठी वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडणारा आकाश दीप (Akash Deep) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2022) त्याच्या ताबडतोड फलंदाजीसाठी चर्चेत आला आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात बंगाल आणि झारखंड (Bangal vs ZharKhand) संघ आमने- सामने आहेत. बंगालसाठी आकाशने पहिल्या डावात अवघ्या १८ चेंडूत स्वतःचे अर्धशतक (५३*) पूर्ण केले. यामध्ये त्याच्या ८ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे या धावा करण्यासाठी त्याने एकही चौकार मारला नाही.

आकाश दीपने केलेले हे अर्धशतक रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest 50 in Ranji Trophy) ठरले आहे. रणजीमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक हे जम्मू काश्मीरच्या बनदीप सिंग (१५ चेंडूत अर्धशतक, २०१५) याच्या नावावर आहे. त्यानंतर १८ चेंडूत अर्धशतक करणाऱ्यांमध्ये यापूर्वी शक्ती सिंग (हिमाचल प्रदेश), युसूफ पठाण (बडोदा) ही नावे होती आता यामध्ये आकाश दीपचे नाव सहभागी झाले आहे. असे असले, तरी बाद फेरीत आकाश दीप हा सर्वाधिक वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज नक्कीच ठरला आहे.

उभय संघातील या सामन्यात फक्त आकाश दीपच्या नावावर अशा प्रकारचा खास विक्रम झाला नाहीये. बंगालच्या संपूर्ण संघानेच या सामन्यात विक्रमी प्रदर्शन केले आहे. त्यांना सामन्याच्या पहिल्या डावात ७ विकेट्सच्या नुकसानावर ७७३ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने एका डावात पहिल्या ९ खेळाडूंनी प्रत्येकी ५० धावांपेक्षा अधिक योगदान दिले आहे. या धावा करण्यासाठी बंगालच्या दोन फलंदाजांनी शतक, तर सात खेळाडूंनी अर्धशतक केले. एवढेच नाही, रणजी ट्रॉफीतील बंगाल दुसरा सर्वाधिक धावसंख्या उभी करणारा संघ आहे, ज्यांच्या एकाही फलंदाजाने द्विशतक केले नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला

अंकितने केलेलं ‘मूसेवाला’ सेलिब्रेशन भलतंच गाजतय, पाहा व्हिडिओ

अशी कामगिरी करणारा ‘होप’ ठरला तिसराच फलंदाज; एकाचवेळी मोडले कोहली, रूटचे विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---