रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) मध्ये शुक्रवारी (४ मार्च) तिसऱ्या फेरीचा दुसरा दिवस खेळला गेला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा दिग्गज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मुंबई संघासाठी एकही धाव करू शकला नाही. रहाणे गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद) झाला, तर दुसरीकडे मनीष पांडेने संघासाठी अप्रतिम शतक ठोकले.
असा राहिला रणजी ट्रॉफीचा दुसरा दिवस-
ग्रूप ‘ए’ मधील गुजरात विरुद्ध मेघालय सामन्यात गुजरातने पहिल्या डावात ८ विकेट्सच्या नुकसानावर ५५५ धावा केल्या आणि डाव घोषित केला. कर्णधार भार्गव मोराईने (२२३) द्विशतक केले. प्रत्युत्तरात मेघालयने ६ विकेट्सच्या नुकसानावर ९९ धावा करू शकला. तसेच मध्य प्रदेश विरुद्ध केरळ सामन्यात पहिल्या डावात मध्य प्रदेशने ५ विकेट्सच्या नुकसानावर ४७४ धावा केल्या. यश दुबेने दुहेरी शतक ठोकले.
ग्रूप ‘बी’ मधील बंगाल विरुद्ध चंडीगड सामन्यात बंगालच्या पहिल्या डावात केलेल्या ४३७ धावांच्या प्रत्युत्तरात चंदीगड संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावा केल्या, तर हैदराबाद विरुद्ध बडोदा सामन्यात दोन्ही संघाचा पहिला डाव लवकर उरकला. पहिल्या डावात हैदराबादने १९७, तर बडोदा संघाने १६३ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात हैदराबातने ६ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावा केल्या.
ग्रूप ‘सी’ मध्ये जम्मू-कश्मीर विरुद्ध रेल्वे या सामन्यात पहिल्या डावात जम्मू कश्मीर संघ २५९ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात रेलवे संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर २९७ धावा केल्या. तसेच कर्नाटक विरुद्ध पद्दुचेरी संघातील सामन्यात पहिल्या डावात कर्नाटक संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर ४५३ धावा केल्या आणि डाव घोषित केला. देवदत्त पडीक्कलने १७८ धावांची महत्वाची खेळी केली. मनीश पांडेने नाबात १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पुद्दुचेरी संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर ५२ धावा केल्या.
मुंबई विरुद्ध ओडिसा या ग्रूप ‘डी’ मधील संघातील सामन्यात ओडिसाने पहिल्या डावात २८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने ३ विकेट्सच्या नुकसानावर २५९ धावा केल्या. सरफराज खानने शतकी खेळी केली. अजिंक्य रहाणे गोल्डन डकवर म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तसेच सौराष्ट्र विरुद्ध गोवा सामन्यात सौराष्ट्रने ३४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गोवा संघाने ४ विकेट्सच्या नुकसानावर २३९ धावा केल्या.
ग्रूप ‘ई’ मधील आंध्रप्रदेश विरुद्ध उत्तराखंड सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात आंध्रप्रदेशने २२६ धावा केल्या. दुसऱ्या डावात उत्तराखंडने २ विकेट्सच्या नुकसानावर ३६ धावा केल्या. तसेच राजस्थान विरुद्ध सर्विसेस राजस्थानने केकेल्या ९२ धावांच्या प्रत्युत्तरात सेना संघाने ३०१ धावा ठोकल्या. दुसऱ्या डावात राजस्थानने एकही विकेट न गमावता २३ धावा केल्या.
हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा या ग्रूप ‘एफ’ मधील सामन्यात हरियाणाने पहिल्या डावात ३०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हिमाचलने १८४ धावा केल्या. दुसऱ्या डावात हरियाणाने एकही विकेट न गामावता ६१ धावा केल्या, तर त्रिपुरा विरुद्ध पंजाब सामन्यात त्रिपुराने केलेल्या १२७ धावांच्या प्रत्युत्तरात पंजाबने १२० धावा केल्या. दुसऱ्या डावात त्रिपुरा संघाने २३२ धावा केल्या.
ग्रूप ‘जी’ मधील महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाने ४६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशने १ विकेटच्या नुकसानावर ६२ धावा केल्या.तसेच विदर्भ विरुद्ध आसाम सामन्यात आसमने ३१६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात विदर्भाने ९ विकेट्सच्या नुकसानावर २६६ धावा केल्या.
ग्रूप ‘एच’ मधील तमिळनाडू विरुद्ध झारखंड सामन्यात तमिळनाडूने पहिल्या डावात २८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडने २२६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात तमिळनाडू संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर १५ धावा केल्या. तसेच दिल्ली विरुद्ध छत्तीसगड सामन्यात पहिल्या डावात छत्तीसगडने ९ विकेट्सच्या नुकसानावर ४८२ धावा केल्या. दिल्ली संघाने पहिल्या डावात ३ विकेट्सच्या नुकसानावर १०८ धावा केल्या.
‘प्लेट’ ग्रूप मधील नागालँड विरुद्ध मिजोरम सामन्यात नागालँडने पहिल्या डावात ५०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मिजोरम संघ ९५ धावांवर बाद झाला. तसेच बिहार विरुद्ध अरुणाचल प्रदेश संघातील सामन्यात अरुणाचलच्या १९६ धावांच्या प्रत्युत्तरात बिहारने १०९ धावा केल्या. दुसऱ्या डावात अरुणाचल प्रदेशने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या. तसेच मणिपूर विरुद्ध सिक्कीम सिक्कीमने केकेल्या ४६२ धावांच्या प्रत्युत्तरात मणिपूरने ७ विकेट्सच्या नुकसानावर २३८ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
शासकीय इतमामात होणार वॉर्नवर अंत्यसंस्कार; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांकडूनही श्रद्धांजली
‘रोहितसेना’ने १००वी कसोटी खेळत असलेल्या विराटला दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’, कोहलीनेही मानले सर्वांचे आभार
दक्षिण आफ्रिका महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी; बांगलादेशला चारली धूळ