एकेकाळी भारतीय संघाचा (Team India) महत्वाचा वेगवान गोलंदाज राहिलेला एस श्रीसंत (S Sreesanth) याने ९ वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) मध्ये त्याला मोठ्या काळानंतर पुनरागमन केले आणि मेघालयविरुद्धच्या सामन्यात पुनरागमनानंतरची पहिली विकेट मिळवली.
केरळचे प्रतिनिधित्व करताना श्रीसंतने मेघालयच्या आर्यन बोराची विकेट घेतली आणि जमिनीवर झोपला. त्याने खेळपट्टीला एकप्रकारे वंदन केले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्यावरील बंदी उठल्यानंतर एखादी विकेट मिळवली असेल. विकेट मिळवणे श्रीसंतसाठी एक भावूक प्रसंग होता आणि त्याने स्वतः याचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.
विकेट घेतल्यानंतर श्रीसंतने अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “९ वर्षांनंतर ही माझी पहिली विकेट आहे. देवाच्या कृपेने जेव्हा मला पहिली विकेट मिळाली, तेव्हा मी खूप खुश झाला होतो आणि जमिनीवर झोपून प्रणाम करू लागलो.”
Now that’s my 1st wicket after 9 long years..gods grace I was just over joyed and giving my Pranaam to the wicket ..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ #grateful #cricket #ketalacricket #bcci #india #Priceless pic.twitter.com/53JkZVUhoG
— Sreesanth (@sreesanth36) March 2, 2022
यापूर्वी श्रीसंतने २०१३ मध्ये त्याचा शेवटचा रणजी सामना खेळला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३८ वर्षीय श्रीसंतने आतापर्यंत २१३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये तो अडकला होता आणि त्यानंतर त्याच्यावर बंदी घातली होती. परंतु, नंतर न्यायलयाने त्याच्यावरील बंदीचा कालावधी कमी केला. आता त्याच्यावरील बंदीचा कालावधी पूर्ण झाला असून त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
श्रीसंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतीय संघासाठी २७ कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये ८७ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याच्या सर्वोत्तम प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने ४० धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याव्यतिरिक्त ५३ एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ७५ विकेट्स घेतल्या.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने एकदा ५५ धाव खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या आणि हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने १० सामने खेळले आहेत आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीसंत २००६ आणि २०११ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात सहभागी होता.
महत्वाच्या बातम्या –
पुजारा-रहाणेला रिप्लेस करतील ‘हे’ खेळाडू? एकाला फक्त २ कसोटींचा अनुभव, पण आहे जबरदस्त लयीत
विराट कोहलीने केली रवी शास्त्रींची नक्कल, माजी प्रशिक्षकाने स्वत: शेअर केला मजेशीर व्हिडिओ