रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्याच दिवशी विदर्भाच्या गोलंदाजांसमोर मुंबईचे फलंदाज फ्लॉप ठरले आहेत. यामध्ये जिंक्य रहाणेपासून ते श्रेयस अय्यरपर्यंत फ्लॉप गेले आहेत. यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मुंबईच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
याबरोबरत मुंबईने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुरुवातीला काही काळ सामना चांगलाच रंगत होता. पण मुंबईचे दोन्ही सलामीवीर पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी चांगले क्रिकेट खेळून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. 19व्या षटकापर्यंत मुंबईचा संघ चांगल्या लयीत दिसत होता. यानंतर भूपेन लालवाणीच्या रूपाने मुंबईला पहिला धक्का बसला असून तो 37 धावा करून बाद झाला आहे.
यानंतर पृथ्वी शॉही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 23व्या षटकात तो देखील बाद झाला. यानंतर मुंबईच्या विकेट पडत राहिल्या आणि 172 धावांतच मुंबईचा निम्म्याहून अधिक संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट केले आहे. यामध्ये त्याने म्हंटले आहे की, चांगली सुरुवात असूनही मुंबईचे फलंदाज अतिशय सामान्य क्रिकेट खेळले होते. पण विदर्भाने गोष्टी साध्या ठेवल्या आणि मुंबईवर दबाव कायम ठेवला. तर या सामन्यात अनेक रोमांचक सत्रे होतील. विकेटवर ज्या प्रकारे गवत दिसत आहे, जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा चेंडू अधिक वळेल ज्यामुळे फिरकी गोलंदाजांना खूप मदत होईल.
After a good start, the @MumbaiCricAssoc batters played some ordinary cricket. On the other hand, Vidarbha have kept things simple and put Mumbai under pressure. I am sure there will be many exciting sessions in this game as the match unfolds. The wicket has grass cover, but the… pic.twitter.com/vVLI4QRGPP
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 10, 2024
दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शार्दूलने पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात 53 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर आदित्य सरवटे याच्या बॉलिंगवर एक धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुलने या अर्धशतकादरम्यान 2 षटकार आणि 6 चौकार ठोकले. शार्दूलच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 12 वं अर्धशतक ठरलं. शार्दुलने 135.1 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं आहे.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.
महत्त्वाच्या बातम्या-
- महादेव बेटिंग ॲप प्रकरणात नवा ट्विस्ट! शाकीब अल हसनच्या अडचणींमध्ये वाढ होणार
- IND Vs ENG : भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने शेअर केला एक अनोखा फोटो