सध्या भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चा हंगाम सुरू आहे. यामध्ये संघांचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे प्रयत्न असून एलीट ग्रुपचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरने एका महत्वाचा पल्ला गाठला आहे. या स्पर्धेत तो गोव्याकडून खेळत आहे. त्याने महाराष्ट्रविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महत्वाची कामगिरी पूर्ण केली आहे.
हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला गेला. त्यामध्ये महाराष्ट्र ८ विकेट्सने जिंकला.
अर्जुनने या सामन्याच्या महाराष्ट्राच्या पहिल्या डावात १२ षटकात ४९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने प्रथम श्रेणीत ५० विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
अर्जुनने २०२२-२३च्या हंगामात गोव्याकडून पदार्पण केले. त्याने खूप कमी वेळातच स्वत:ला अष्टपैलूही साबित केले. त्याने त्याच्या पहिल्याच रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याने हे शतक राजस्थानविरुद्ध केले होते. तसेच त्याने प्रथम श्रेणीत गोव्याकडून खेळताना एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्याने आतापर्यंत दोन वेळा चार विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी २५ धावा देत ५ विकेट्स घेत केली आहे.
अर्जुनच्या कामगिरीची तुलना नेहमीच त्याचे वडिल आणि दिग्गज सचिन तेंडुलकरशी केली जात असते. सचिनने प्रथम श्रेणीत ७१ विकेट्स घेतल्या. यामुळे तो त्याच्या वडिलांपासून प्रथम श्रेणीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या कामगिरीत केवळ त्याला २१ विकेट्स दूर आहे.
सचिननेही त्याच्या प्रथम श्रेणीच्या पदार्पणातच शतकी खेळी केली होती. अर्जुनने आतापर्यंत खेळलेल्या २४ लिस्ट ए मध्ये २६ आणि २९ टी२० सामन्यात ३५ विकेट्स घेतल्या आहेत.
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेत अर्जुन खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना ५ सामने खेळले होते. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल.
सध्या गोवा विरुद्ध केरळ सामना सुरू असून त्यामध्येही अर्जुनने केरळच्या पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने संघाच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ३६ धावाही केल्या आहेत.






