रणजी ट्रॉफी स्पर्धेत शनिवारपासून(22 डिसेंबर) सातव्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या फेरीत फिरोजशहा कोटला मैदानावर होणाऱ्या दिल्ली विरुद्ध मध्यप्रदेश सामन्याआधी बीसीसीआयचे उत्तर विभागातील क्यूरेटर सुनील चौहान यांनी खेळपट्टीवर ज्यादा पाणी टाकले आहे आणि नियमांचे उल्लंघन करत सामना सुरु होण्याआधीच ते तिथून निघून गेले.
खेळपट्टीवर ज्यादा पाणी झाल्याने या सामन्याला तब्बल अडिच तास उशीर झाला. हा सामना थेट दुसऱ्या सत्रात सुरु झाला. यामुळे चौहान यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
बीसीसीआयच्या नियमांनुसार खेळपट्टी तयार करण्यासाठी तटस्थ क्यूरेटर पाठवण्यात येते जेणेकरुन घरच्या संघाला त्याचा कोणताही फायदा घेता येणार नाही. त्या क्यूरेटरला सामना सुरु झाल्यावर पहिल्या सत्रानंतर स्थानिक क्यूरेटरकडे जबाबदारी सोपवून जाण्याची परवानगी असते.
शनिवारी सामना सुरु होण्याआधी मॅच रेफ्री डॅनिएल मनोहर आणि दोन पंच विरेंद्र शर्मा आणि संजय हजारे या दोन पंचांना खेळपट्टी ओली असल्याचे आढळून आले. त्यामुळे ठरलेल्या वेळी सकाळी 9.30 वाजता सामना सुरु झाला नाही
धरमशाला येथील असणारे चौहान हे खेळपट्टी तयार करण्यासाठी प्रभारी क्यूरेटर होते. त्यांनी सामन्याच्या आदल्या दिवशी खेळपट्टीला पाणी दिले होते.
दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे वरिष्ठ अधिकारी याबद्दल म्हणाले, ‘सुनील चौहान यांच्या सुचनेनुसार शुक्रवारी खेळपट्टीला पाणी देण्यात आले होते. ते धरमशाला येथील असल्याने त्यांना उत्तर भागातील वातावरणाची पूर्ण माहिती आहे. त्यांनी संध्याकाळी 4 वाजता खेळपट्टीला पाणी दिले आणि नैसर्गिकरित्या तिथे थंडी आहे आणि त्यामुळे थोड्या सुर्यप्रकाशासह ओलावा आहे.’
पण सामना सुरु होण्याआधी सकाळी बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे चौहान यांनी उपस्थित राहुन मॅच रेफ्रींकडे मैदानाची जबाबदारी सोपवायला हवी होती. पण ते त्यावेळी कोठेही दिसले नाही.
याबद्दल अधिकारी म्हणाले, ‘चौहान यांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत स्थानिक क्यूरेटरने जबाबदारी घेण्याआधी इथे थांबायला हवे होते. हा साधारण नियम आहे. ते गेल्यानंतर आमचे क्यूरेटर अंकित दत्ता यांनी बाहेरच्या ग्राउंडस्टाफसह मैदान तयार केले. येथील नियमित ग्राउंडस्टाफ यांनी बंद पुकारला होता.’
मात्र याबद्दल अजून चौहान यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
बीसीसीआयचे व्यवस्थापक सबा करीम म्हणाले, ‘मला मान्य आहे की कोटलामध्ये जे काही झाले ते व्हायला नको होते. पण मला विश्वास आहे की कोणत्यातरी कारणामुळे चौहान हे लवकर निघून गेले. ते दिल्लीमधून सकाळी 10 वाजताच्या विमानाने निघाले होते. ते साधारण असे कधी करत नाहीत. त्यामुळे मला विश्वास आहे की यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, ते आम्ही शोधून काढू.’
या सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत दिल्लीने पहिल्या डावात 6 बाद 156 धावा केल्या आहेत. तसेच मध्य प्रदेशचा पहिला डावा प्रथम फलंदाजी करताना 132 धावांवरच संपुष्टात आला आहे. त्यामुळे दिल्ली 24 धावांनी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११
–टीम इंडियाचे हे दोन प्रमुख खेळाडू मेलबर्न कसोटीला मुकणार ?
–हार्दिक पंड्याने काढलेला टीम इंडियाचा सर्वोत्तम सेल्फी पाहिला का ?