भारतात सध्या रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. तर या स्पर्धेत दररोज अनेक सामने खेळवले जात आहेत. पण या सामन्यांदरम्यान भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. कारण, रणजी ट्रॉफी लुप्त होत चाललेल्या निराश आणि संतप्त झालेल्या मनोज तिवारीनेन बीसीसीआयला पुढच्या हंगामापासून रणजी ट्रॉफी बंद करण्याचा सल्लाही दिला आहे.
याबरोबरच, बंगालचे क्रीडा मंत्री आणि स्टार क्रिकेटर मनोज तिवारीने गेल्या महिन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर मनोज तिवारीला त्याचा शेवटचा प्रथम श्रेणी सामना हा फक्त ईडन गार्डन्सवर खेळणार असल्याचे त्याने याआधीच सांगितले आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात याच मैदानातून झाली असून त्याला याच मैदानावरुन आपली कारकीर्द समाप्त करायची आहे.
याआधी सोशल मीडियावर बंगालचे क्रीडा मंत्री आणि स्टार क्रिकेटर मनोज तिवारीने पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले आहे की, ‘पुढील सीझनपासून रणजी ट्रॉफी कॅलेंडरमधून काढून टाकली पाहिजे. तर या स्पर्धेत अनेक चुका होत आहेत. एवढी मोठी स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. या स्पर्धेचे आकर्षण आणि महत्त्व कमी होत आहे. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटत आहे.
सध्या मनोज तिवारी हा सध्या बंगालचा क्रीडा मंत्री आहेत आणि तो त्यांच्या देशांतर्गत संघाचे नेतृत्वही करत आहेत. आतापर्यंत त्याने 146 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 10124 धावा केल्या आहेत. याबरोबरच, मनोज तिवारीने 30 शतके आणि 45 अर्धशतकेही केली आहेत. याशिवाय त्याने 169 सामन्यांमध्ये 5581 धावा आणि 183 टी-20 मध्ये 3436 धावा केल्या आहेत.
Ranji trophy should be scrapped off from the calendar from the next season onwards. So many things going wrong in the tournament. So many things need to looked into in order to save this prestigious tournament which has a rich history. It’s losing its charm and importance.…
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 10, 2024
दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली बंगाल संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यापैकी एक सामना संघाने जिंकला आहे. तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच बंगाललाही एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह बंगाल एलिप्स ग्रुप बी मध्ये पॉइंट टेबलवर पाचव्या स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । ‘आई-वडिलांनी ठरवले की त्या दिवशी…’, स्वतः एमएस धोनीने सांगितले 7 नंबरच्या जर्सीमागील कारण
U19 World Cup 2024 : शांत स्वभाव पाहता, अश्विनला उदय सहारनमध्ये दिसतो ‘हा’ स्टार भारतीय खेळाडू