---Advertisement---

दु:खद! गुजरातला रणजी खेळायला गेलेल्या क्रिकेटपटूचा मृत्यू, शेवटच्या सामन्यात घेतल्या होत्या 5 विकेट्स

On: शनिवार, जानेवारी 14, 2023 9:25 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटविश्वात सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. खेळाडूंची उत्तम कामगिरी पाहून चाहत्यांची या स्पर्धेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच दु:खद वृत्त समोर येत आहे. हिमाचल प्रदेशचा युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा 28 वर्षाचा सिध्दार्थ शर्मा (Siddharth Sharma)याचा मृत्यू झाला आहे. त्याने गुरूवारी (12 जानेवारी) शेवटचा श्वास घेतला. तो रणजी सामना खेळण्यासाठी संघासोबत गुजरातला पोहोचला होता, मात्र तो आजारी पडला.

माध्यमातील काही रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ मागील काही दिवस व्हेटींलेटरवरही होता. हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट केले. या वेगवान गोलंदाजाने त्याच्या शेवटच्या सामन्यात पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्याला काही शारीरिक समस्या होत्या, याच कारणास्तव त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि वडोदरामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूवर आजी-माजी क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले आहे.

सिध्दार्थने त्याच्या संघाकडून विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. त्याच्या मृत्यूवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दुख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘हिमाचल प्रदेश विजय हजारे ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य आणि स्टार वेगवान गोलंदाज सिध्दार्थ शर्मा याचा मृत्यूबाबत दु:ख वाटले. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवाराबाबत दु:ख व्यक्त केले आहे.’

https://twitter.com/CMOFFICEHP/status/1613808259529601025?s=20&t=tAcsv-TV-1PNSYzQpUMrRA

सिध्दार्थने त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण 2017-18च्या हंगामामध्ये केले. तेव्हापासून त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 25 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने पहिल्या लिस्ट ए सामना 2021-22च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला. तेथे त्याने 6 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या.

https://twitter.com/doddaganesha/status/1613922134769926144?s=20&t=tAcsv-TV-1PNSYzQpUMrRA

उनामध्ये जन्मलेल्या सिद्धार्थची स्थानिक कामगिरी काही मोठी नाही. त्याने हिमाचल प्रदेशकडून पाच वर्षात एक टी20 सामना, 6 प्रथम श्रेणीचे सामने आणि तेवढेच लिस्ट ए चे सामने खेळले. त्याचा शेवटचा सामना बंगाल विरुद्ध होता, जो कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला गेला. त्यामध्ये त्याने 5 विकेट्स घेतले होते. (Ranji Trophy Himachal Pradesh Pacer Siddharth Sharma Dies aged 28)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र केसरी 2023: महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख माती विभागातून उपांत्य फेरीत भिडणार
ईस्ट बंगाल एफसीचे आव्हान संपल्यात जमा; पिछाडीवरून जमशेदपूर एफसीचा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---