जगातील सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांपैकी एक म्हणून रणजी ट्रॉफीला ओळखले जाते. 1934 पासून चालत आलेली ही स्पर्धेचा 89 वा हंगाम 5 जानेवारी 2024 पासून सुरु होतोय. एकूण 38 संघ यात सहभागी होणार असून 5 जानेवारी पासून याची सूरूवात होत आहे. महाराष्ट्रातून तीन संघ दरवर्षी रणजी स्पर्धेत सहभागी होतात. त्यात मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ रणजी संघांचा समावेश होतो.
मुंबई संघाची रणजी स्पर्धेतील कामगिरी-
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातीस सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या या मुंबईने एक-दोन नाही तर तब्बल 41 वेळा ही स्पर्धा जिंकलेली असून, 5 वेळा उपविजेतेपदापर्यंत मजल मारली आहे. तब्बल 15 वेळा सलग रणजी ट्रॉफी जिंकण्याचा मानही मुंबईकडे असून, हा एक जागतिक विक्रम आहे. ही ऐतिहासिक कामगिरी त्यांनी 1958-59 ते 1972-73 यादरम्यान केलेली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही संस्था मुंबई क्रिकेट संघाचे संचालन करते. आपल्या “खडूस” शैलीच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई रणजीकडून सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, झहीर खान, दिलीप वेंगसकर सारखे मातब्बर क्रिकेटर खेळलेले आहेत.
महाराष्ट्र संघाची रणजी स्पर्धेतील कामगिरी-
राज्यातील आणखी एक रणजी संघ म्हणजे ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ चा महाराष्ट्र संघ. 1934-35 या रणजीच्या पहिल्या हंगामापासून हा संघ खेळत असून, डी.बी.देवधर हे त्यावेळी कर्णधारपदी होते. 1939-40 व 1940-41 हंगाम असे दोन वेळा महाराष्ट्राने रणजी विजेतेपद पटकावले आहे. तर तीन वेळा उपविजेते पदावर समाधानी राहावे लागले आहे. 1948-49 च्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना बाबूसाहेब निंबाळकर यांनी एका डावात तब्बल 443 धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफी व प्रथम श्रेणी क्रिकेटमधे कोणत्याही भारतीय फलंदाजाकडूनची ही आजपर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. महाराष्ट्र संघ रणजी स्पर्धेत तीन वेळा उपविजेता देखील राहिला आहे.
विदर्भ संघाची रणजी स्पर्धेतील कामगिरी-
हा संघ मूख्यत: विदर्भ व पूर्व महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो. नागपूर मधील व्ही.सी.ए स्टेडियमवर यांचे मॅचेस खेळवल्या जातात. विदर्भाने 2017-18 व 2018-19 या दोन हंगामात फैज फजलच्या नेतृत्वाखाली सलग दोन विजेतेपदं जिंकली होती. उमेश यादवसारखा मोठा खेळाडूही भारतीय संघाला विदर्भ रणजी संघानेच दिलाय.
रणजी ट्रॉफीचा इतिहास-
रणजी ट्रॉफीचा एक ऐतिहासिक स्पर्धा आहे, जी पहिल्यांदा 1934 मध्ये खेळला गेली होती. ही स्पर्धा सुरुवातीला भारतातील विविध संस्थानांतील संघांदरम्यान खेळली गेली होती, पण स्वातंत्र्यानंतर देशातील विविध राज्यांतील संघांचा समावेश करण्यासाठी या स्पर्धेचा विस्तार करण्यात आला आहे. रणजी करंडक ही स्पर्धा नेहमीच लक्षवेधी ठरली आहे. यामधून भारतीय कसोटी संघासाठी दारं खुली होतात.
आजपर्यंतचे रणजी ट्राॅफीचे विजेते
१९३४-३५, मुंबई (विजेता), उत्तर भारत (उपविजेता)
१९३५-३६, मुंबई (विजेता), मद्रास (उपविजेता)
१९३६-३७, नवानगर (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९३७-३८, हैदराबाद (विजेता), नवानगर (उपविजेता)
१९३८-३९, बंगाल (विजेता), दक्षिण पंजाब (उपविजेता)
१९३९-४०, महाराष्ट्र (विजेता), उत्तर प्रदेश (उपविजेता)
१९४०-४१, महाराष्ट्र (विजेता), मद्रास (उपविजेता)
१९४१-४२, मुंबई (विजेता), म्हैसूर (उपविजेता)
१९४२-४३, बडोदा (विजेता), हैद्राबाद (उपविजेता)
१९४३-४४, उत्तर भारत (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९४४-४५, मुंबई (विजेता), होळकर (उपविजेता)
१९४५-४६, होळकर (विजेता), बडोदा (उपविजेता)
१९४६-४७, बडोदा (विजेता), होळकर (उपविजेता)
१९४७-४८, होळकर (विजेता), मुंबई (उपविजेता)
१९४८-४९, मुंबई (विजेता), बडोदा (उपविजेता)
१९४९-५०, बडोदा (विजेता), होळकर (उपविजेता)
१९५०-५१, होळकर (विजेता), गुजरात (उपविजेता)
१९५१-५२, मुंबई (विजेता), होळकर (उपविजेता)
१९५२-५३, होळकर (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९५३-५४, मुंबई (विजेता), होळकर (उपविजेता)
१९५४-५५, मद्रास (विजेता), होळकर (उपविजेता)
१९५५-५६, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९५६-५७, मुंबई (विजेता), सर्व्हिसेस (उपविजेता)
१९५७-५८, बडोदा (विजेता), सर्व्हिसेस (उपविजेता)
१९५८-५९, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९५९-६०, मुंबई (विजेता), म्हैसूर (उपविजेता)
१९६०-६१, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९६१-६२, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९६२-६३, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९६३-६४, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९६४-६५, मुंबई (विजेता), हैद्राबाद (उपविजेता)
१९६५-६६, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९६६-६७, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९६७-६८, मुंबई (विजेता), मद्रास (उपविजेता)
१९६८-६९, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९६९-७०, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९७०-७१, मुंबई (विजेता), महाराष्ट्र (उपविजेता)
१९७१-७२, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९७२-७३, मुंबई (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)
१९७३-७४, कर्नाटक (विजेता), राजस्थान (उपविजेता)
१९७४-७५, मुंबई (विजेता), कर्नाटक (उपविजेता)
१९७५-७६, मुंबई (विजेता), बिहार (उपविजेता)
१९७६-७७, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)
१९७७-७८, कर्नाटक (विजेता), उत्तर प्रदेश (उपविजेता)
१९७८-७९, दिल्ली (विजेता), कर्नाटक (उपविजेता)
१९७९-८०, दिल्ली (विजेता), मुंबई (उपविजेता)
१९८०-८१, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)
१९८१-८२, दिल्ली (विजेता), कर्नाटक (उपविजेता)
१९८२-८३, कर्नाटक (विजेता), मुंबई (उपविजेता)
१९८३-८४, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)
१९८४-८५, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)
१९८५-८६, दिल्ली (विजेता), हरियाणा (उपविजेता)
१९८६-८७, हैद्राबाद (विजेता), दिल्ली (उपविजेता)
१९८७-८८, तामिळनाडू (विजेता), रेलवे (उपविजेता)
१९८८-८९, दिल्ली (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९८९-९०, बंगाल (विजेता), दिल्ली (उपविजेता)
१९९०-९१, हरियाणा (विजेता), मुंबई (उपविजेता)
१९९१-९२, दिल्ली (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)
१९९२-९३, पंजाब (विजेता), महाराष्ट्र (उपविजेता)
१९९३-९४, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)
१९९४-९५, मुंबई (विजेता), पंजाब (उपविजेता)
१९९५-९६, कर्नाटक (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)
१९९६-९७, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)
१९९७-९८, कर्नाटक (विजेता), उत्तर प्रदेश (उपविजेता)
१९९८-९९, कर्नाटक (विजेता), मध्य प्रदेश (उपविजेता)
१९९९-००, मुंबई (विजेता), हैद्राबाद (उपविजेता)
२०००-०१, बडोदा (विजेता), रेलवे (उपविजेता)
२००१-०२, रेलवे (विजेता), बडोदा (उपविजेता)
२००२-०३, मुंबई (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)
२००३-०४, मुंबई (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)
२००४-०५, रेलवे (विजेता), पंजाब (उपविजेता)
२००५-०६, उत्तर प्रदेश (विजेता), बंगाल (उपविजेता)
२००६-०७, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)
२००७-२००८, दिल्ली (विजेता), उत्तरप्रदेश (उपविजेता)
२००८-२००९, मुंबई (विजेता), उत्तरप्रदेश (उपविजेता)
२००९-२०१०, मुंबई (विजेता), कर्नाटक (उपविजेता)
२०१०- २०११, राजस्थान (विजेता), बडोदा (उपविजेता)
२०११-२०१२, राजस्थान (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)
२०१२-२०१३, मुंबई (विजेता), सौराष्ट्र (उपविजेता)
२०१३-२०१४, कर्नाटक (विजेता), महाराष्ट्र (उपविजेता)
२०१४-२०१५, कर्नाटक (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)
२०१५-२०१६, मुंबई (विजेता), सौराष्ट्र (उपविजेता)
२०१६-२०१७, गुजरात (विजेता), मुंबई (उपविजेता)
२०१७-२०१८, विदर्भ (विजेता), दिल्ली (उपविजेता)
२०१८-२०१९- विदर्भ (विजेता), सौराष्ट्र (उपविजेता)
२०१९-२०२०- सौराष्ट्र (विजेता) , बंगाल (उपविजेता)
२०२०-२१, रद्द
२०२१-२२,मध्यप्रदेश (विजेता), मुंबई (उपविजेता)
२०२२-२३, सौराष्ट्र (विजेता), बंगाल (उपविजेता)
२०२३-२४, सध्या सुरु
महत्वाच्या बातम्या –
केपटाऊन कोसटी जिंकण्यासाठी भारताला 79 धावांचे लक्ष्य, फलंदाज रबाडा आणि लुंगी एनगिडीला उत्तर देण्याच्या तयारीत
कौतुक करावं तितकं कमीच! प्रतिकूल परिस्थितीत मार्करमचं सुरेख शतक, डीन एल्गरला ट्रिब्यूट