रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने ४१ वेळेचा रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबई संघाचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. मध्य प्रदेशचे हे पहिलेवहिले रणजी ट्रॉफीचे विजेतेपद ठरले आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. यावेळी मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम यामध्ये एक योगायोग जुळून आला आहे.
पंडित यांनी १९९८-९९च्या रणजी ट्रॉफी हंगामात मध्य प्रदेशच्या संघाचे नेतृत्व केले होते. यामध्ये मध्य प्रदेशचा संघ अंतिम सामन्यात कर्नाटककडून ९६ धावांनी पराभूत झाला होता. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. आता २३ वर्षानंतर मध्य प्रदेशने याच स्टेडियमवर आदित्य श्रीवास्तवच्या नेतृत्वाखाली पहिली रणजी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. कर्णधार असताना जे जमले नाही ते प्रशिक्षक म्हणून जमून आल्याने पंडित यांच्या डोळ्यात आंनदाश्रू आले होते.
सामन्यानंतर पंडित यांनी आपले शब्द व्यक्त करताना म्हटले, “माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण आहे. या मैदानावर माझ्याकडून काही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या. कर्णधार असताना रणजी ट्रॉफी जिंकण्यास मी मुकलो होतो, मात्र आदित्यने ते पूर्ण केले आहे. या संघात अनेक युवा खेळाडू आहेत. मध्य प्रदेशमध्ये मला क्रिकेटची संस्कृती आणायची आहे.”
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡! 👏 👏
Madhya Pradesh beat Mumbai by 6 wickets & clinch their maiden #RanjiTrophy title👍 👍 @Paytm | #Final | #MPvMUM
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13D0nP pic.twitter.com/XrSp2YzwSu
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 26, 2022
“मला जेव्हा प्रशिक्षकपदाची विचारणा करण्यात आली तेव्हा मी ती संधी दवडली नाही. आदित्य हा एक उत्कृष्ट कर्णधार आहे. त्याच्यासोबत ज्या चर्चा झाल्या त्या गोष्टी त्याने अंमलात आणल्या. फलंदाजी निराशाजनक होऊन सुद्धा त्याने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे,” असेही पंडित यांनी पुढे म्हटले आहे.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात सरफराज खान याने शतक केल्याने संघाची धावसंख्या ३७४ एवढी झाली. त्याच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत ५३६ धावांचा डोंगत रचला. यावरून त्यांनी १६२ धावांची आघाडी घेतली होती. या डावामध्ये सलामीवीर यश दुबे, मधल्या फळीतील शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शतके केली.
मुंबईचा दुसरा डाव २६९ धावांवरच संपुष्टात आला. विजयासाठी मध्य प्रदेशला १०८ धावांची आवश्यकता असताना यष्टीरक्षक हिमांशू मंत्रीने संघाला उत्तम सुरूवात करून दिली. नंतर शुभम शर्माने ३० धावांची खेळी करत संघाला विजयाजवळ नेले. पाटीदारने दुसऱ्या डावातही सुरेख फलंदाजी केली आहे. त्याने नाबाद ३० धावा करताना विजयी धाव घेतली. पुरस्कार वितरण झाले असता सामनावीर शर्मा ठरला आहे. तर मालिकावीराचा पुरस्कार सरफराज खानने पटकावला आहे.
या सामन्यातील पहिला दिवस वगळता बाकी चार दिवस मध्य प्रदेश संघाने आपले वर्चस्व ठेवले होते. फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला नंतर गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना रोखून धरले. याबरोबरच मध्य प्रदेशची या सामन्यातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉल अन् बरंच काही, आयर्लंडशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाची मस्ती
गडी लय तापलाय! पंचांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात पृथ्वी शॉने घातला राडा, पाहा व्हिडिओ