---Advertisement---

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, या संघाच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2025 11:17 AM
---Advertisement---

रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये काल (30 जानेवारी) रोजी मुंबई विरुद्ध मेघालय यांच्यात सुरू झालेल्या सामन्यात एक असा विक्रम होताना दिसला जो आतापर्यंत भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडला नव्हता. शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मुंबई येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मेघालय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्यांनी त्यांचे पहिले 6 विकेट्स फक्त 2 धावांवर गमावले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात यापूर्वी कधीही असे पाहिले गेले नव्हते की एखाद्या संघाने इतक्या कमी धावसंख्येत आपले सहा विकेट गमावले.

नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो की शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीने ते बरोबर असल्याचे सिद्ध झाले. मेघालय संघाने पहिला विकेट शून्य धावांवर गमावला, त्यानंतर दुसरा विकेट एक धावांवर पडला. मुंबईकडून तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने हॅट्ट्रिक घेत मेघालयवर पूर्ण दबाव आणला. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मेघालय संघाने २ धावांवर सहावी विकेट गमावली. पहिल्या डावात मेघालयातील सहा खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. खालच्या फळीतील खेळाडूंमुळे मेघालयला पहिल्या डावात 86 धावांचा टप्पा गाठता आला.

जर आपण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्या 6 विकेट्स पडल्यानंतर संघाच्या धावसंख्येवर नजर टाकली तर मेघालय संघ आता त्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यादीत सर्वात वरचा क्रमांक एमसीसी संघाचा आहे. ज्याने 1872 मध्ये काउंटी हंगामात शून्य धावांवर आपले पहिले सहा विकेट गमावले होते. त्यानंतर मेघालय संघाचा क्रमांक लागतो. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठाचा संघ आहे. ज्यांनी 1867 मध्ये तीन धावांवर त्यांचे पहिले सहा विकेट गमावले होते.

हेही वाचा-

IND vs ENG: पुणे टी20 सामन्यासाठी MCA स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी या दिवशी भारतीय संघ दुबईला रवाना होणार, स्पर्धेपूर्वी टीम इंडियाबाबत मोठे अपडेट्स समोर
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, कर्णधारांचे फोटोशूट रद्द! मोठे कारण समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---