---Advertisement---

क्या बात! रणजी पदार्पणात मुंबईकर फलंदाजाचे द्विशतक, प्रशिक्षकांच्या समोर मोडला त्यांचाच रेकॉर्ड

On: मंगळवार, जून 7, 2022 9:30 PM
Suved-Parkar
---Advertisement---

रणजी ट्रॉफी २०२२ चे सध्या उपांत्यपूर्व सामने खेळले जात आहेत. दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (७ जून) मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या सुवेद पारकरने द्विशतक ठोकले. दिग्गज अजिंक्य रहाणे या सामन्यासाठी अनुपस्थित असल्यामुळे सुवेदला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. मुंबई संघाचे प्रशिक्षक अमोल मजूमदारसाठी सुवेदची ही खेळी प्रत्यक्षात पाहणे खास होते.

रणजी ट्रॉफीच्या या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने ८ विकेट्सच्या नुकसानावर ६४७ धावा केल्या आणि त्यांचा पहिला डाव घोषित केला. ही धावसंख्या उभी करण्यासाठी सुवेद पारकर (Suved Parkar) आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) यांचे प्रदर्शन महत्वाचे ठरले. सुवेदने या सामन्यात ४४७ चेंडू खेळले आणि २५२ धावा केल्या. यामध्ये त्याच्या २१ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.  तर सरफराजने देखील २०५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५३ केल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक करणारा सुवेद मुंबई संघाचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुंबई संघासाठी अशी कामगिरी १९९४ मध्ये केली गेली होती, म्हणजेच आजपासून तब्बल २८ वर्षांपूर्वी. अमोल मजूमदार यांनी त्यावेळी हरियाणाविरुद्धच्या एका सामन्यात पदार्पण केले आणि २६० धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे अमोल सध्या मुंबई संघाचे प्रशिक्षक आहेत आणि सुवेदने त्यांच्या उपस्थितीत ही अप्रतिम खेळी केली आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक ठोकणारा सुवेद १२ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये तो तिसरा असा फलंदाज ठरला आहे, ज्याने पदार्पणाच्या सामन्यात २०० पेक्षा अधिक धावांची खेळी केली असेल. त्याच्या आधी या हंगामात सकीबुल गनी (३४१) आणि महाराष्ट्र संघाचा पवन शाह (२१९) यांनी पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक आहे बिहारच्या सकीवुल गनी याचा. त्याने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातील लीग स्टेजमध्ये मिजोरम संघाविरुद्ध पदार्पण केले आणि ३४१ धावांची खेळी केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

IPL मीडिया राईट्सच्या लिलावात ‘या’ पाच कंपन्यांमध्ये स्पर्धा, बीसीसीआयच्या गल्ल्यात येणार ४० हजार कोटी!

अश्विनला पछाडत चहल बनणार टी२० क्रिकेटचा किंग! नंबर १ बनण्यापासून फक्त इतक्या विकेट्सने दूर

मुंबई इंडियन्सला मिळणार भावी संघमालकीण? मुकेश-नीता अंबानींची होणारी सूनबाई चर्चेत, वाचा तिच्याबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---