रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत बहुतेक भारतीय स्टार खेळाडू फ्लाॅप होत असताना, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने मात्र आपली छाप सोडली आहे. अलिकडेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत, सर्व दिग्गज खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहेत. सौराष्ट्रकडून खेळताना जडेजाने दिल्लीविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे सौराष्ट्रने दिल्लीला फक्त 188 धावांत गुंडाळले.
या सामन्यात दिल्लीकडून रिषभ पंतही खेळताना दिसला. पण तो या सामन्यात केवळ एक धाव करू शकला. जयदेव उनादकटने पहिल्याच षटकात दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर, जेव्हा जडेजा गोलंदाजी करायला आला तेव्हा त्याने दिल्लीच्या फलंदाजांना सावरण्याची संधी दिली नाही. जडेजाने 17.4 षटके गोलंदाजी करत 66 धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. युवा अष्टपैलू खेळाडू आणि दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी एकटाच संघर्ष करताना दिसला. त्याने 60 धावांची खेळी खेळली. त्यामुळे संघाला 188 धावांपर्यंत मजल मारता आली.
बोर्डाने कडक भूमिका घेतल्यानंतर, अनेक भारतीय स्टार खेळाडू रणजीमध्ये खेळण्यासाठी आले आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल दोघेही मुंबईकडून खेळत आहेत. मात्र यामध्ये दोघेही फ्लॉप ठरले. जयस्वाल चार धावा काढून बाद झाला आणि रोहित तीन धावा काढून बाद झाला. रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीपर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरला फक्त 11 धावा करता आल्या. कर्नाटकविरुद्ध पंजाबकडून खेळणारा शुबमन गिल काही खास कामगिरी करू शकला नाही. तो देखील चार धावा करून बाद झाला.
🚨 RAVINDRA JADEJA – FIVE WICKET HAUL IN THE RANJI TROPHY. 🚨
– Jadeja is back with a bang in Ranji. pic.twitter.com/GWIrhfqtrX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 23, 2025
भारतीय संघाच्या नियमित सदस्यांमध्ये, केएल राहुल आणि विराट कोहली हे एकमेव खेळाडू आहेत जे भारतीय संघाचा भाग नसतानाही रणजी ट्रॉफीमध्ये खेळत नाहीयेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांमुळे दोघांनीही या सामन्यासाठी स्वतःला अनुपलब्ध घोषित केले होते. मात्र, दोघांनीही आपापल्या संघांच्या पुढील रणजी सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा-
कर्णधारपदात उत्तीर्ण, पण फलंदाजीत आलेख घसरला, नेतृत्व स्वीकारल्यापासून सूर्याच्या कामगिरीत घट
Ranji trophy; दिग्गज खेळाडूंनी भरलेली मुंबई अवघ्या 120 धावांत सर्वबाद, जम्मू काश्मीरची शानदार गोलंदाजी
Ranji trophy; महाराष्ट्राला मोठा धक्का, अंपारच्या निर्णयाचा निषेध केल्याने या खेळाडूवर बंदी