---Advertisement---

Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 25, 2022 6:03 PM
Baba-Aparajith
---Advertisement---

गुरुवारी (२४ फेब्रुवारी) रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) च्या लीग सामन्यांपैकी दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. तमिळनाडूसाठी बाबा इंद्रजीत आणि बाबा अपराजित या जुळ्या भावांनी शतकी खेळी केली. या दोघांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर तमिळनाडूची धावसंख्या पहिल्या ३०० पार गेली. तसेच कर्नाटकसाठी खेळणाऱ्या करुण नायरचा शतकाचा दुष्काळही संपला. तर भारतीय दिग्गज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.

जुळ्या भावांची तमिळनाडूसाठी वैयक्तिक शतके
तमिळनाडू आणि छत्तीसगड संघ रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात आमने सामने आहेत. तमिळनाडूसाठी मध्यक्रमात फलंदाजी करणारे जुळे भाऊ बाबा इंद्रजीत आणि बाबा अपराजित यांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी वैयक्तिक शतके पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या ३०० पेक्षा जास्तपर्यंत घेऊन गेले.

इंद्रजीतने दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ११६ धावा केल्या होत्या. आता छत्तीसगडविरुद्ध १२७ धावांची खेळी केली आणि स्पर्धेतील सलग दुसरे शतकही पूर्ण केले. दुसरीकडे अपराजीतने पहिल्या डावात १६६ धावांची तुफानी खेळी केली आहे. पहिल्या दिवशी तमिळनाडूची धावसंख्या चार विकेट्सच्या नुकसानावर ३०८ होती, तर पहिल्या डावात संघ ९ विकेट्सच्या नुकसानावर ४७० धावा केल्या आहेत.

करुण नायरच्या शतकाचा दुष्काळ संपला
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी तिहेरी शतक करणारे दोन खेळाडू आहेत. एक म्हणजे दिग्गज विरेंद्र सेहवाग आणि दुसरा म्हणजे करुण नायर. असे असले तरी, करुण नायर मागच्या चार वर्षांपासून शतकी खेळीची वाट पाहत होता. गुरुवारी अखेर त्याची ही प्रतिक्षा संपली आहे. कर्नाटकसाठी चार वर्षांनंतर त्याच्या बॅटमधून शतक निघाले आहे.

जम्मू कश्मीरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी नायरने १५२ धावांची नाबाद खेळी केली होती. दुसऱ्या दिवसी १७५ धावा करून तो बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटकने ८ विकेट्सच्या नुकसानावर २६८ धावा केल्या, तर दुसऱ्या दिवशी संघ ३०२ धावांवर सर्वबाद झाला. दुसरीकडे जम्मू कश्मीरच्या उमरान मलिकने १२ षटकांमध्ये ३५ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या.

चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म कायम
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत संधी न मिळाल्यामुळे चेतेश्वर पुजाराला रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चांगले प्रदर्शन करणे महत्वाचे बनले आहे. परंतु, सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणारा पुजारा ओडिसा संघाविरुद्ध गुरुवारी अवघ्या ८ धावांवर बाद झाला. त्याने सहा चेंडूंचा सामना केला आणि सलग दोन चौकार मारून विकेट गमावली. पहिल्या दिवशी सौराष्ट्र संघाने ४ विकेट्सच्या नुकसानावर ३२५ धावा केल्या.

अजिंक्य रहाणे शून्य धावांवर बाद 
अजिंक्य रहाणेही मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. रणजी ट्रॉफीत मुंबई सघांसाठी प्रतिनिधित्व करतनाही रहाणेचा फॉर्म सुधारलेला दिसत नाही. मुंबईचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्या दिवशी संपला, तर गोवा संघानेही २ विकेट्सच्या नुकसानावर ११४ धावा केल्या. अजिंक्य रहाणे शून्य धावांवर बाद झाला. परिणामी संघाचा पहिला डाव अवघ्या १६३ धावांवर गुंडाळला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेलाही संधी मिळालेली नाही, अशात रणजी ट्रॉफीचा चालू हंगाम रहाणेसाठी महत्वाचा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ राज्यात सुरू होतेय देशातील पहिलीच महिला क्रिकेट अकादमी, विनाशुल्क पुरवल्या जातील सुविधा

संधीचे सोने! तब्बल ९७ सामन्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळेलेल्या फलंदाजाचा न्यूझीलंडविरुद्ध शतकी तडाखा

‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---