इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगामात यशस्वी जयस्वाल त्याच्या प्रतिभेप्रमाणे खेळू शकला नाही. पण रणजी ट्रॉफीमध्ये त्याने कमाल प्रदर्शन केले आहे. उत्तर प्रदेश आणि मुंबई संघात सध्या रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वीने धमाकेदार प्रदर्शन केले.
२० वर्षीय यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. या सामन्याच्या आधीही त्याने उत्तराखंडविरुद्ध शतकी खेळी केली होती. उत्तराखंडसोबत खेळताना पहिल्या डावात त्याने ३५, तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या. त्यानंतर आता उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने पहिल्याच डावात शतकी खेळी केली. पहिल्या डावात त्याने २२७ चेंडू खेळले आणि १०० धावा करून बाद झाला. यामध्ये त्याच्या १५ चौकारांचा समावेश आहे.
रणजी ट्रॉफीचा हा उपांत्य सामना बेंगलोरमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ विकेट्सच्या नुकसानावर २६० धावा केल्या आहेत. यामध्ये जशस्वीचे योगदान सर्वात मोठे आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्या डावात स्वतःचे खातेही खोलू शकला नाही.
चालू रणजी हंगामात यशस्वीने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत आणि यामध्ये २३८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या दोन शतकांचा समावेश देखील आहे. मुंबई संघासाठी चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये यशस्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएल २०२२ हंगाम यशस्वी जयस्वालसाठी अपेक्षेप्रमाणे गेला नाही. राजस्थान रॉयल्सचा महत्वाचा खेळाडू असलेल्या यशस्वीने यावर्षी १० आयपीएल सामने खेळले आणि यामध्ये २५८ धावा केल्या. संपूर्ण हंगामा त्याच्या बॅटमधून अवघ्या दोन वेळा अर्धशतकी खेळी निघाली. अपेक्षित प्रदर्शन न केल्यामुळे राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने त्याला काही सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले. पण नंतर जेव्हा त्याने संघात पुनरागमन केले, तेव्हा चांगले प्रदर्शन केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय खेळाडूंच्या जर्सी नंबरमागील फंडा आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर
INDvsSA: आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ‘तो’ महापराक्रम करण्यासाठी भुवनेश्वर फक्त एक पाऊल दूर
अखेर पुरस्कारांचा दुष्काळ संपला! पाकिस्तान अन् श्रीलंकेला पहिल्यांदाच मिळालाय आयसीसीचा ‘हा’ पुरस्कार