आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय राहिला होता. मात्र, टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिलने शतक झळकावल्याने काही चिंता दूर झाल्या आहेत. गिलचे हे शतक रणजी सामन्यात कर्नाटकविरुद्धच्या दुसऱ्या डावात आले. परंतु, त्याचे शतक देखील संघाचा सन्मान वाचवू शकला नाही. पहिल्या डावात पंजाबचा संघ फक्त 55 धावांवर बाद झाला. ज्याला उत्तर देताना कर्नाटकने 475 धावांचा डोंगर उभा केला. शुबमन गिलच्या शतकानंतरही पंजाबला दुसऱ्या डावात फक्त 213 धावा करता आल्या. त्यांनी हा सामना एका डाव आणि 207 धावांच्या मोठ्या फरकाने गमावला.
शुबमन गिलने 171 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 102 धावा केल्या आणि तो बाद झाला. श्रेयस गोपाळने त्याला पायचीत केले. तथापि, गिलच्या शतकानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरनेही सुटकेचा नि:श्वास सोडला असवा. नुकत्याच संपलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये गिलसह भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. अशा परिस्थितीत बीसीसीआयने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले होते.
HUNDRED FOR CAPTAIN SHUBMAN GILL. 💯
At one point Punjab was 84/6 and then he scored a Magnificent Hundred for Punjab in very tough situation.
– CAPTAIN SHUBMAN GILL LEADS BY EXAMPLE. pic.twitter.com/3q7416XNe5
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 25, 2025
गिल व्यतिरिक्त, कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी या स्पर्धेत भाग घेतला. गिल व्यतिरिक्त, जडेजाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करण्यात यश मिळवले. परंतु रोहित-जयस्वाल आणि पंतची बॅट अजिबात चालली नाही.
रणजीचा पुढचा टप्पा 30 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. त्या दरम्यान विराट कोहली देखील या देशांतर्गत स्पर्धेत परतेल अशी अपेक्षा आहे. मानेच्या दुखण्यामुळे, कोहली 23 जानेवारीपासून सुरू झालेल्या सहाव्या फेरीत खेळला नाही. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही या टप्प्यात भाग घेतला नाही. त्यालादेखील कोपरात (elbow) समस्या होती.
हेही वाचा-
पाकिस्तानच्या हरिस रौफचा घमंड तुटणार, अर्शदीपकडे ही कामगिरी करण्याची उत्तम संधी
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी हा खेळाडू ‘X’ फॅक्टर ठरणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
38 वर्षाय खेळाडूनं रचला पकिस्तान क्रिकेटमध्ये नवा इतिहास, अशी कमागिरी करणारा प्रथमच!