मोहाली। रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबने तिसऱ्या दिवशी (16 डिसेंबर) तमिळनाडू विरुद्ध 479 धावा करत 264 धावांची आघाडी घेतली. तर तमिळनाडूने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत 237 धावा केल्या असून ते 27 धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने पंजाबकडून अष्टपैलू खेळी केली आहे.
रविवारी (16 डिसेंबर) पंजाबने 308 धावांवरून खेळाला सुरूवात केली. यामध्ये शुभमन गिलने 268 धावा केल्या तर युवराजने 34 चेंडूमध्ये 41 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार मारले. यावेळी त्याने गिल बरोबर 61 धावांची भागीदारी केली.
युवराज मात्र यावेळी धावबाद झाला. नंतर गिलने गुरकिरथ मान (48) सोबत 83 धावांची भागीदारी केली.
तमिळनाडूच्या दुसऱ्या डावात युवराजने गोलंदाजी करत दोन विकेट्सही घेतले आहेत. यावेळी त्याने एन जगदिसनला (50) बाद केले. त्याचा झेल अभिषेक गुप्ताने घेतला. तर युवराजने बाबा अपराजितला पायचीत करून दुसरी विकेट घेतली.
आयपीएलच्या लिलावाआधी युवराजची ही अष्टपैलू कामगिरी त्याला किती फायदेशीर ठरली हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उद्या (18 डिसेंबर) आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव जयपूर येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: भारत-आॅस्ट्रेलियाच्या कर्णधारांमध्येच झाली शाब्दिक चकमक, लायनने घेतले सावरुन
–हॉकी विश्वचषक २०१८: बेल्जियम बनले नवीन चॅम्पियन, थरारक अंतिम लढतीत नेदरलॅंड्सचा केला पराभव
–कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली