रणवीर सिंग आणि दिपिका पादुकोण यांच्यासाठी शनिवारचा(११ सप्टेंबर) दिवस खास ठरला आहे. कारण शनिवारी या दाम्पत्याने बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिच्यासोबत काही चांगला वेळ घालवला आहे. रणवीरने शनिवारी पीव्ही सिंधूसोबत वेळ घालवल्यानंतर एक सेल्फी काढला असून तो त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
त्याने शेअर केलेल्या फोटोत रणवीर, दीपिका आणि पीव्ही सिंधू हे तिघेही अगदी आनंदात दिसत आहेत आणि असे वाटते आहे की यांच्यामध्ये अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. रणवीरने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांच्या पसंतीला पडला आहे.
फोटो पाहून असे वाटते की, तिघांनी एकमेकांसोबत शनिवारचा दिवस चांगला घालवला आहे. फोटोत रणवीर त्याच्या हटके स्टाईलमध्ये आणि डोळ्यांवर मोठे सनग्लासेस घातलेला दिसत आहे. तर पीव्ही सिंधू प्लेन पांधऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि दीपिकाने कानात गोल्डन इयररिंग्स घातलेल्या असून पांधरा टाॅप घातलेला आहे.
रणवीरने हा फोटो शेअर करत कॅप्शमध्ये लिहिले आहे की, “स्मॅशिंग टाइम.” त्याने या पोस्टमध्ये दीपिका आणि पीव्ही सिंधूलाही टॅग केले आहे. चाहत्यांनी त्याची ही पोस्ट आवडली आसून पोस्टला एक मिलियनपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CTsRs5LsY7w/
रणवीरच्या या पोस्टवर पीव्ही सिंधूने कमेंटही केली आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण तुमच्यासोबत चांगला वेळ घालवला. लवकरच तुम्हाला पुन्हा भेटण्याची आशा आहे.” तिच्यासोबतच रणवीरच्या या पोस्टवर इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.
पीव्ही सिंधूनेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून तोच फोटो पोस्ट केला आहे आणि त्याच्यासह कॅप्शमध्ये लिहिले आहे की, “आमच्या चेहऱ्यावरचा आनंदच दाखवतो की आम्ही सोबत किती मजेदार वेळ घालवला आहे.” सिंधूने रणवीर आणि दीपिकाला पोस्टमध्ये टॅग केले आहे.
https://www.instagram.com/p/CTtZbGUvT0X/
सिंधूने नुकतेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली होती. ती ऑलिम्पिकमध्ये २ वैयक्तिक पदकं जिंकणारी पहिली पहिला भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तान क्रिकेटविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या पेनला ‘या’ अनुभवी खेळाडूने सुनावली खरीखोटी
आयपीएल कॉलिंग! दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू इंग्लडहून पोहचले दुबईत, आता ‘इतके’ दिवस राहणार क्वारंटाईन
“पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा कसोटी रद्द होण्याशी काही संबंध नाही”