fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडियाची सुपरस्टार कर्णधार हरमनप्रीत कौर झाली शक्तिमान

भारतीय महिला क्रिकेटपटू जेमीमा रोड्रिगेज आणि तिची संघसहकारी हरलीन देओलने एक रॅप गाणे तयार केले आहे. हे रॅप टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर असून त्यात या दोघीही अभिनय करताना दिसत आहे.

हरमनप्रीत कौरने नुकताच 100वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला आहे. यामुळे तिचे खास कौतूक  करण्यासाठी हे गाणे तयार करण्यात आले. जेमीमाने तिच्या ट्विटरवर हे रॅप साँग शेअर केले आहे. त्यात ‘तुझ्या टी20 मधील 100व्या सामन्याबद्दल अभिनंदन.’ असेही म्हटले आहे.

“लिल जे तर्फे तुला या ठिकाणी तुझ्या मोठ्या यशासाठी एक छोटी सदिच्छा.” असे जेमीमाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

रॅप साँगच्या या व्हिडीओमध्ये जेमीमा रो़ड्रिगेजने एक पांढरा बॅगी स्वेटशर्ट घातला असून एका हातात क्रिकेट ग्लव्हज घातला आहे. तर हरलीन देओलने तिच्या खांद्यावर हुडी घेतली आहे.

हरलीन देओल आणि जेमीमाने त्यांच्या गाण्यातून हरमनप्रीत कौरला थॉर आणि शक्तीमानची उपमा दिली. त्याचबरोबर हरमनप्रीतला “तू पंजाबीयांचा गर्व आहेस.” अशाप्रकारच्या अनेक उपमा दिल्या.

या व्हिडीओला प्रतिक्रिया देत हरमनप्रीत कौरने ट्वीट केला आहे की, “पुन्हा एकदा, धन्यवाद.” पुढे तिने लिहीले आहे, “आपण सर्वांनी माझ्यासाठी जे केले ते पाहून खरोखर आनंद झाला आहे.”

नुकत्याच भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात पार पडलेल्या द्विपक्षीय टी20 मालिकेच्या सहाव्या सामन्यात सुरत येथे शुक्रवारी हरमनप्रीत कौरने 100वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 सामने खेळणारी ती महिला किंवा पुरूष खेळाडूंमध्ये पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. हरमनप्रीतपाठोपाठ माजी कर्णधार एमएस धोनी आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी टी20मध्ये 98 सामने खेळले आहेत.

You might also like