मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. सूर्यकुमार यादव याचा झंझावात आणि गोलंदाजी विभागाचे भेदक प्रदर्शन याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 27 धावांनी विजय मिळवला. असे असले तरी गुजरातचा अष्टपैलू राशिद खान याने केलेल्या दर्जेदार कामगिरीने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 218 धावा कुटल्या. सूर्यकुमार यादव याने अवघ्या 49 चेंडूत नाबाद 103 धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या डेव्हिड मिलर वगळता इतर मुख्य फलंदाजांना पूर्णतः अपयश आले. मात्र, राशिद खान याने अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.
राशिदने गोलंदाजी करताना चार षटकात 30 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स देखील घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीत त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळ दाखवला. गुजरातने 13.2 षटकांमध्ये आपली आठवी विकेट गमावली होती. तिथून पुढे त्याने जोसेफ याला साथीला घेऊन अखेरपर्यंत किल्ला लढवला. त्याने 32 चेंडूत सर्वाधिक 79 धावा केल्या. यात तीन चौकार आणि तब्बल 10 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे तो या खेळी दरम्यान दुखापतग्रस्त असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. तरीदेखील त्याने आपला हा खेळ सुरूच ठेवला.
आयपीएल इतिहासात एकाच सामन्यात 75 पेक्षा जास्त धावा व चार बळी मिळवण्याची कामगिरी आतापर्यंत दोन खेळाडूंना करता आली होती. यामध्ये आता राशिद खानचा समावेश झाला. या आधी पॉल वॉल्थटी याने पंजाबसाठी खेळताना 2011 मध्ये 79 धावा व चार बळी मिळवले होते. तर युवराज सिंगने 2014 मध्ये आरसीबीसाठी 83 धावा व चार बळी असे योगदान दिलेले.
(Rashid Khan All Round Performance Creat Record Against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला हरवण्यासाठी राशिद खानने मारले तब्बल 10 षटकार, पण सूर्याच्या शतकामुळे मुंबईच विजयी
सूर्याचा स्पेशल सिक्स! शेवटच्या चेंडूवर साकारले पहिले आयपीएल शतक