इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी म्हणून रिलायन्स ग्रुपच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता जगभरातील इतर लीगमध्ये देखील फ्रॅंचाईजी खरेदी केली आहे. पुढील वर्षी नव्याने सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीग व संयुक्त अरब अमिरातील इंटरनॅशनल लीग टी20 या स्पर्धांमध्ये संघ खरेदी केले आहेत.
आता त्या दोन्ही फ्रॅंचाईजीसाठी त्यांनी आपल्या कर्णधारांची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये एमआय केपटाऊन या संघाचे नेतृत्व अफगाणिस्तानचा राशिद खान करेल. तर, इंटरनॅशनल लीग टी20 मध्ये एमआय एमिरेट्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड हा सांभाळताना दिसेल.
🇮🇳🇦🇪🇿🇦 Leaders of the #OneFamily. 💙#MICapeTown #MIEmirates @MIEmirates @MICapeTown @ImRo45 @KieronPollard55 @rashidkhan_19 pic.twitter.com/ngGMQWSrgS
— Mumbai Indians (@mipaltan) December 2, 2022
मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरून याबाबतची घोषणा केली गेली. कायरन पोलार्ड हा तब्बल 13 वर्ष मुंबई इंडियन्सचा प्रमुख सदस्य होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आयपीएलमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले. असे असले तरी तो, इंटरनॅशनल लीग टी20 मध्ये एमआय एमिरेट्स संघाची धुरा वाहताना दिसेल.
दुसरीकडे, एमआय केपटाऊन संघाचा कर्णधार म्हणून अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू राशिद खान हा जबाबदारी सांभाळेल. राशीद आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. तसेच तो जगभरातील अनेक टी20 लीगमध्ये खेळताना दिसतो. एमआय केपटाऊन संघात राशिदव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा, इंग्लंडचे सॅम करन व लियाम लिव्हिंगस्टोन तसेच दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यांचा समावेश आहे.
(Rashid Khan And Kieron Pollard Lead MI Capetown & MI Emirates Respectively)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या हंगामासाठी नवा नियम, सामन्यात एका संघाचे 11 नाहीतर 15 खेळाडू होणार सहभागी
नेमका तो गोल होता की नाही? जपानच्या ‘त्या’ वादग्रस्त गोलमुळे जर्मनी स्पर्धेबाहेर