मुंबई । आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडवणारा राशिद खान जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम युवा गोलंदाज मानला जातो. राशिद खान हा चेंडूला जास्त वळण देऊ शकत नाही. मात्र तो गुगली अत्यंत प्रभावीपणे टाकतो. आपल्या मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न करतो.
लहान वयात प्रभावी कामगिरी करत अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा राशिद खानने नुकतेच म्हटले आहे की अफगाणिस्तानचा संघ विश्वचषक जिंकल्यानंतरच तो लग्न करेल. त्याने त्याचा हा प्रण आझादी रेडिओला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला.
21 वर्षीय राशिद खान सध्या आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारीत 736 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. राशिदने त्याचा शेवटचा सामना मार्च महिन्यात आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सामन्यात खेळला. राशिदच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने ती मालिका जिंकली होती.
या मालिकेतील 3 सामन्यात त्याने 5 गडी बाद केले होते. त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडून 4 कसोटी 71 वनडे आणि 48 टी20 सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून त्याने 200 पेक्षा जास्त बळी टिपले आहेत.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीच्या शैलीने आयपीएलमध्ये देखील त्याने प्रभाव टाकला आहे. सनरायझर्स हैदराबादने 2017 साली त्याला चार कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आयपीएलमध्ये पदार्पण करताच पहिल्याच मोसमात त्याने 17 बळी टिपले होते. त्यानंतर 2019 ला हैद्राबाद संघाने त्याला 9 कोटी रुपयांमध्ये कायम केले.
आयपीएलच्या 46 सामन्यात त्याने 55 बळी घेतले आहेत. सध्या सनरायजर्स हैदराबाद संघातील तो एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
चुकीला माफी नाही? मयंक अगरवालच्या त्रिशतकाची खिल्ली उडवलेल्या त्या व्यक्तीला मागावी लागली होती माफी
अमिताभ बच्चन लवकर बरे व्हा, पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने केली प्रार्थना
भारताचा हा दिग्गज क्रिकेटपटूही आढळला कोरोना पॉझिटिव्ह