---Advertisement---

‘केवळ तिकिट घेऊनच स्टेडियममध्ये प्रवेश करा,’ राशिदची भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना विनंती

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 8:11 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) रात्री भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आमना सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. भारतीय संघ जर या सामन्यात पराभूत झाला, तर संघाचा टी२० विश्वचषकातील पुढचा प्रवास संपणार आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानला उपांत्य सामन्यात स्थान पक्के करणासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने त्यांच्या संघाच्या चाहत्यांना एक विनंती केली आहे.

विश्वचषकात भारताविरुद्ध सामन्याच्या आधी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये २९ ऑक्टोबरला रोमांचक सामना खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. हा सामना पाकिस्तानने जिंकल्यानंतर या दोन्ही संघांच्या चाहत्यांमधील संघर्ष पाहायला मिळाला होता. तसेच सामन्यादरम्यान काही चाहते तिकिट नसतानाही स्टेडियाममध्ये घुसले होते.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांनी स्टेडियममध्ये जबरदस्ती प्रवेश केल्यामुळे त्याठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला होता. यानंतर दुबई पोलिसांनी स्टेडियमचे दरवाचे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अशात काही चाहते असे होते, ज्यांच्याकडे सामन्याचे तिकिट असूनही त्यांना सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नव्हता. आता भारताविरुद्धच्या सामन्यात असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी राशिद खानने चाहत्यांना एक विनंती केली आहे.

राशिद खानने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून चाहत्यांना ही विनंती केली आहे. त्याने या व्हिडिओत ज्यांच्याकडे सामन्याचे तिकिट नाहीत त्यांनी स्टेडिममध्ये जबरदस्ती घुसू नये, असा संदेश दिला आहे. त्याने व्हिडिओत सांगितले की, मी अफगाणिस्तान आणि भारत सामन्यासाठी खूप उत्साहित आहे. मागच्या आठवड्यात स्टेडियममध्ये जे काही झाले, ते निराश करणारे होते. आपल्याला आपला राष्ट्रीय ध्वज फडकवायचा आहे आणि आपल्या देशाच्या इज्जत लक्षात ठेवायची आहे. कृपया नियमांचा सन्मान करा आणि आयोजकांचे समर्थन करा. केवळ तिकिट घेऊनच स्टेडियममध्ये प्रवेश करा.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात स्टेडियमच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे चाहत्यांनी गोधळ घातला होता. सामना अंतिम टप्प्यात आल्यानंतर आणि निकाल समोर आल्यावर दोन्ही देशांचे चाहते एकमेकांसोबत भिडलेले पाहायला मिळाले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला होता. काही चाहत्यांना त्यांच्याकडे तिकिट असूनही स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नसल्यामुळे आयसीसीला त्या चाहत्यांची माफी मागावी लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्कॉटलंडविरुद्ध ९३ धावांची खेळी करताच मार्टिन गप्टीलने केली ‘हिटमॅन’ रोहितची बरोबरी

नवा ‘सिक्सर किंग’: ९३ धावांच्या खेळीसह गप्टिल बनला टी२० चा ‘बॉस’

T20 WC 2021, INDvsAFG, Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, टीम इंडियात सूर्यकुमार, अश्विनचे कमबॅक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---