अफगानिस्तानचा गोलंदाज राशीद खानची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. वन-डे बरोबरच त्याने टी-20 प्रकारातही कमी वयात जलद विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
या 19 वर्षीय खेळाडूने 31 सामन्यात 52 विकेट्स घेऊन नवा विक्रम केला आहे. बांग्लादेश विरूध्दच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने पहिल्यात चेडूंतच ही कामगिरी केली.
राशीदने या सामन्यात 3 षटकांत 13 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीला आला असता 2 चेंडू खेळून त्याने एक षटकारही मारला.
राशीदच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा स्पीनर इम्रान ताहिरने केला होता. त्याने 31 टी-20 सामन्यात 58 विकेट्स घेतले आहेत. तसेच श्रीलंकेच्या अजंता मेडिंसने 26 टी-20 सामन्यातच विकेट्सचे अर्धशतक साजरे केले आहे.
या वर्षीच्या विश्वचषकाच्या क्वालीफायरमध्ये राशीदने वन-डेत कमी वयात जलद विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्याने 44 सामन्यात100 विकेट्स घेतले आहे.
बांग्लादेश विरूध्दच्या या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत अफगानिस्तान 1-0 ने पुढे आहे. अफगानिस्तानचा संघ 14 जूनला होणाऱ्या भारत विरूध्दच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी चांगलीच तयारी करत आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडिअम, बेंगलोरवर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–६ पैकी त्या एका अॅवार्डमुळे कागिसो रबाडा होतोय सोशल मीडियावर ट्रोल!
–आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत दक्ष अगरवाल, श्रावणी खवळेचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
–प्रो-कबड्डीच आहे भारतातील दुसरी सर्वात लोकप्रिय लीग, काही वर्षात करेल आयपीएलची बरोबरी
–Video: नदालने केले बॉलबॉयचे स्वप्न पूर्ण
–बेन स्टोक्स नंतर इंग्लंडचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर